BREAKING NEWS
latest
maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुंबई भाजपा मुंबईत 'अब की बार चारसो पार'चा नारा बुलंद करणार

भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन
गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारण्याचे आवाहन
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची माहिती
विशेष प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे ६ एप्रिल रोजी चारशे कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला "अब की बार चारसो पार" हा नारा बुलंद करण्याचे नियोजन आहे. तसेच हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या दिवशी राम मंदिराच्या निर्माणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गुढी उभारून स्वागत करूया असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.
मुंबई भाजपा कोअर कमिटीची बैठक रंग शारदा येथे पार पडली. त्यानंतर आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बैठकीला कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर, आ. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. मनीषाताई चौधरी, आ. अमित साटम, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, महामंत्री संजय उपाध्याय उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता आवश्यक ते कार्यक्रम राबवण्यासंबंधी चर्चा बैठकीत झाली. महायुतीच्या प्रचारात आम्ही सर्वात पुढे राहू.
गुढी पाढव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून १ हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचे नियोजन केले आहे. सीएए च्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे.
 बरोबरीने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता अशा आशयाचे १४ महत्त्वाचे मेळावे तसेच १४० वस्त्यांमध्ये संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. रामनवमीनिमित्त कल्पक कार्यक्रम तसेच मुंबईतील वस्त्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात येतील. महावीर जयंती आणि हनुमान जयंती या निमित्तानेही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, एनडीए मजबुत होतेय, मोदीजींचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईसह राज्यात इंडी आघाडीला पराभूत करणारी महाशक्ती महायुतीत परावर्तित होतेय याचा आम्हाला आनंद आहे. 

पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची
पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या.आपल्या स्वार्थासाठी वडिलांचे विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धवजींनी सोडले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्यासमोर मुजरा केला, त्यांना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलंय, हे सत्य चित्र आहे. स्वतःच्या पक्षासाठी गर्दी जमू शकत नाही म्हणून आता २२ पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवावी लागते, अशी उद्धवजींची आजची अवस्था आहे अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

केंद्रीय पत्रकार संघाचा ४ था वर्धापन दिवस साजरा होणार आपल्या सांगलीत!

विशेष प्रतिनिधी
सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघटना ही एक राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांसाठी लढणारी आणि त्यांच्या विकासासाठी काम करणारी संघटना असून या संघटनेत आतापर्यंत देशभरात पन्नास हजाराहून अधिक पत्रकारांचा समावेश आहे. या संघटनेला आतापर्यंत तीन वर्ष पूर्ण झाली असून चौथ्या वर्षात ही संघटना पदार्पण करणार आहे त्यासाठी १३ मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १० मार्चला सांगलीतील इस्लामपूर तालुक्यामध्ये सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ना.बच्चू कडू (भाऊ) यांच्या मार्गदर्शनात वाटचाल करणाऱ्या प्रहार शिक्षक संघटना पुरस्कृत "प्रहार क्रांती सन्मान सोहळा" हा दिनांक १० मार्च रोजी इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रम शाळा सभागृहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण, तहसीलदार धनश्री यादव, दै. पुढारीचे उपसंपादक सुनील माने आणि प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष दिग्विजय पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष उमेश शेवाळे आणि सदगुरु आश्रम शाळेचे संस्थापक एकनाथराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी इतरही सन्माननीय पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मान्यवर वाळवा- शिराळा तालुक्यातील आदर्श पत्रकार आणि आदर्श शिक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

तृतीयपंथीयां करीता आर्थिक साक्षरता उपक्रम संपन्न!

विशेष प्रतिनिधी

आर्थिक नियोजनापासून कोणी वंचित राहू नये या उद्देशाने लोकमान्य सेवा संघ, पार्ले पु.वि.भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये तृतीयपंथीना आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंड चे पश्चिम विभागीय प्रमुख स्वरूप भाटवडेकर यांनी मार्गदर्शन केले. 


थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या समाजातल्या घटकांनी दर महिन्याला बचत करून ती गुंतवणूक करणे अनिवार्य कसे आहे हे समजावून सांगितले. याप्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष उदय तारदाळकर,संघ कार्यवाह डाॅ. रश्मी फडणवीस, पु.वि. भागवत शाखा कार्यवाह सुजित वायंगणकर,ध्रुव पाटील,

वा.पाठक ग्रंथ संग्रहालय कार्यवाह वासंती वैद्य, दिशा कर्णबधिर विद्यालय कार्यवाह सुरक्षा घोसाळकर तसेच किन्नर मा संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक प्रिया पाटील यांच्या सोबत १०० हून अधिक तृतीयपंथी उपस्थित होते.

"मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण"

मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी *मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम उपस्थित पालकांचे स्वागत करून आपल्या मुलांना मराठी माध्यमातून प्रवेश घेऊन त्यांनी घेतलेला निर्णय किती अचूक योग्य आहे. याचे महत्त्व सांगण्यात आले. 

  जपान, फ्रान्स जर्मनी या तीन देशातील मुले जगावर राज्य करतात. कारण या देशातील पालक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिकवितात. हाच मुद्दा अधोरेखित करून उपस्थित पालकांनी घेतलेला मराठी माध्यमाचा निर्णय हा अत्यंत बरोबर व मुलांच्या मानसिकतेला धरून आहे याबाबत संकल्प संस्थेचे अध्यक्ष विष्णू बाळ धुरी सरांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा काडीचाही संबंध नाही हे याच शाळेतील अनेक माजी विद्यार्थी जे आज डॉक्टर, इंजिनिअर, सीए होऊन देशा परदेशात स्थायिक झाले आहेत त्यांची माहिती देण्यात आली. जी भाषा घरात बोलली जाते त्याच भाषेतून जर मुलांना शिकविले गेले तर मुलांचा केवळ बौद्धिक विकास नव्हे तर आत्मिक विकास सुद्धा होतो हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. "टिकवायचं जर असेल मुलांचं बालपण...तर मुलांना द्यायलाच हवे मातृभाषेतून शिक्षण," ही गोष्ट समस्त पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घराबाहेर पडल्यावर भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी पालकांनी सुरुवात मराठीतूनच करावी अस वचन उपस्थित पालकांकडून घेण्यात आले.


संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी मातृभाषेचे महत्त्व व त्यासोबतच विद्यार्थी, महिलांनी सुरक्षिततेच्याबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत अचूक मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुख्याध्यापिका सुविधा शिर्के यांच्या मार्गदर्शनाने शिक्षिका स्मिता मोरे व
स्नेहल गावडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता


      कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता

न्याय रणभूमी प्रतिनिधी - रोहन दसवडकर

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. कोकण कला व शिक्षण विकास ही एक संस्था आहे जी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे समाजाला चांगले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करते.  ही संस्था वंचित मुलांना मदत करते आणि शिक्षण, गावाचा विकास, अनाथाश्रमांना मदत, आपत्ती निवारण मदत आणि गंभीर आजार असलेल्या मुलांसाठी वैद्यकीय मदत यांना प्रोत्साहन देते.  
    २९ ऑक्टोबर २०२३ रोजी या संस्थेची यशाची आणि इतरांच्या मदतीची यशस्वी १२ वर्षे पुर्ण झाली. भव्य दिव्य अशी सजावट या निमित्ताने करण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
     संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंदी व मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलेला व  'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री  सौ. दीपा परब - चौधरी यांनी देखील स्वतःची उपस्थिती दर्शवली. त्यांना कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर माल्वणींतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या की माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.
   याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दादर येथे आज पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, अमित कुबडे, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
काशिनाथ धुरू हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍक्टर अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.



शाहरुख खानच्या सिनेमावर कॉपीचा आरोप; चोरले 'मनी हाइस्ट'चे सीन?

मुंबई: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा आता नुसता चित्रपट राहिला नसून एक सोहळा बनला आहे. चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून एटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत ६२० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान कलेक्शनच्या पलीकडेही या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर बोलले जात आहे. 'जवान २', याचे कथानक, संवाद याबद्दल चर्चा होते आहे. शिवाय सध्या एका चर्चेने जोर धरला आहे की सिनेमातील बरेच सीन कॉपी आहेत. प्रसिद्ध स्पॅनिश वेब सीरिज 'मनी हाइस्ट' आणि 'जवान' यांचा संबंध जोडला जातो आहे. या शोमधून शाहरुखच्या चित्रपटातील अनेक सीन्स कॉपी केल्याचा दावा केला जात आहे.

भारत की शान राष्ट्रीय सन्मान 2023 पुरस्कार सोहळा


हर काम देश के नाम या ब्रिद वाक्याने प्रेरित समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांना नि:स्वार्थ सेवा व अलौकिक सामाजिक योगदानासाठी आयुषमान प्रतिष्ठान व स्वरकुलच्या वतीने गुरूनानक खालसा महाविद्यालय सभागृह, माटुंगा (पूर्व) येथे आयोजित सन्मान सोहळ्यात भारत की शान राष्ट्रीय सन्मान 2023 प्रख्यात लेखक,नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता अशोकजी समेळ यांच्या शुभहस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिध्द बालकलाकार वरदा देवधर, गुरूनानक खालसा महाविद्यालयाचे संचालक किरण माणगावकर, आरटीआय अधिकारी अनिल गलगली,स्वरकुलसंस्थेच्या अध्यक्षा, कीर्तनकार डाॅ. वीणा खाडिलकर यांसारखे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींच्या देशभक्तीपर गीत, प्रसिध्द कवी, साहित्यिकांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. मराठी चित्रपट उद्योगातील गायक, संगीतकार, अभिनेते त्यागराज खाडिलकर यांच्या अमृतवाणीतील सूत्र संचालनाने मंत्रमुग्ध सोहळा अनुभवल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. राष्ट्रगीताने अभूतपूर्व सोहळ्याची सांगता झाली.

आचार्य अत्रे आणि आधुनिक राज्यकर्ते!

आमच्या देशातील गरिबांच्या घरावरचे संरक्षक पत्रे उडाले तरी चालतील परंतू शब्दांचा किस घेत एकमेकांना चावणारे , धरणाच्या पाण्यावरून जनतेची थट्टा करणारे, एका पायावर रात्री अपरात्री एकत्र येऊन पहाटे शपथ विधी करणारे, शेपटीवाल्या प्राण्यालाही लाज वाटेल असे आधुनिक महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आहे!

     पहिल्यांदा जंगलात वणवा पेटण्यासाठी एखादी विडी पुरेशी होती. आता राजकीय पक्षात फुट पाडण्यासाठी ईडी भुमिका बजावते. पूर्वी आंघोळीसाठी पाणी गरम करायला आमचे तांब्यांचे बंब पुरेसे असायचे. आता राजकारणात स्वतःच्याच विकासाच्या पोळया भाजायला म्हणे ट्रिपल इंजिन लागते. एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील डोक्याला बाशिंग बांधून प्रतिक्षेत असणाऱ्या लग्नाळू युवकांना वेस ओलांडून मुलगी मिळताना असंख्य अडचणींवर मात करावी लागते. तर दुसरीकडे भारतातील अंजू आणि पाकिस्तानातील सीमा सहजपणे दुसर्‍यांदा संसार थाटतात. आम्ही मात्र कित्येक वर्षे सीमा प्रश्नात अडकून पडलो आहोत. सद्या चहा आणि रिक्षावाल्यांना सन्मान प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किंमतीची, महागाईची चिंता करू नये. विकास नावानेच अविकसित मानसिकतेच्या राज्यकर्त्यांची चलती आहे. तर दोन कुटुंबातील राजकीय भांडण सोडवताना हतबल झालेली चुलती आहे. 

     महिलांच्या प्रश्नावरून एकमेकींच्या झिंज्या उपटणार्‍या आता निमूटपणे पीडित महिलांचा केसाने गळा कापून एकमेकींच्या गळ्यात गळे घालून एकत्र नांदत आहेत. राजकीय नेते नियम बासनात गुंडाळून लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत आहेत. दादा, भाऊंचे झेंडे खांद्यावर घेऊन प्रसंगी विरोधकां सोबत हातापायी करून विविध केसेस पदवी सारख्या मिरवत त्यांना आगेबढो करणारे, स्वतःच्या आईबापाला वेळ न देणारे कार्यकर्ते लाडक्या नेत्याने विश्वासात न घेता पक्ष बदल केल्याने अनाथ झाले आहेत. त्यांच्या व्यथा आणि कथा परखडपणे आपल्या लेखणीतून मांडणारे आचार्य अत्रें सारखे प्रतिभावंत संपादक, लेखक नामशेष झाले आहेत. 

आचार्य अत्रे हयात असते तर त्यांनी मजबूत पुल कसे असावेत यासाठी आमच्या पु.ल.देशपांडे यांच्याकडे पाहून शिकावे. समृध्दी महामार्गावर उघडले स्वर्गाचे व्दार असे देवेंद्रच्या फोटोसहित ठिकठिकाणी स्वागत फलक लावावे. उगीचच विरोधकांसारखे यमाला बदनाम करणे सोडावे. टोल नाक्यावर मर्तिकाचे सामान उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्ते नेमावेत असे सांगितले असते.  
    
टिका करण्यासाठी टीकाकार आणि समोरची व्यक्तीही तोलामोलाची लागते. त्यांच्या झंझावाती व्यक्तीमत्वाचे राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी *रायटर अँन्ड फायटर ऑफ महाराष्ट्र* असे वर्णन केले होते. अनेक राजकीय नेत्यांवर ते बेधडक टीकास्त्र सोडत. भारतीय संघराज्याचे मंत्री आणि मुंबईचे महापौर सदाशिव कानोजी पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला. या विश्वात जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना केली होती. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी केलेली बोचरी टीका सर्वज्ञात आहे!

     आताच्या नेत्यांची पातळी पाहून आचार्य अत्रेही संभ्रमात पडले असते कारण भ्रष्टाचार करणारे नेते दुसर्‍या पक्षात गेले की धुतल्या तांदळा सारखे पांढरे शुभ्र होतात! त्यांच्यावर दगड फेकणारे मुग गिळून गप्प बसतात. एकीकडे राष्ट्रपती पदासाठी आदिवासी स्त्रिला प्रतिनिधीत्व करण्याची संधी आणि दुसरीकडे आदिवासी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंदी अशी दुतोंडी भुमिका पार पाडतात. याचे धगधगते उदाहरण म्हणजे मणिपूर मध्ये सत्तेसाठी होणारी महाभारताची पुनरावृत्ती होय. लोकशाहीचे चिरहरण होत असताना नरेंद्र डोळ्याला पट्टी बांधून बसले आहेत. प्रसार माध्यमे कळीच्या नारदाची भुमिका बजावत आहेत. गेला माधव कुणीकडे ? असा जनतेला प्रश्न पडला आहे. तिच स्थिती पूरग्रस्तांची आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पाहणी करण्यासाठी पायी चालत गेलेल्या मंत्र्यांचे प्रसार माध्यमातून तोंड भरून कौतुक होत आहे. वर्षानुवर्षे अडचणींचा सामना करणारी जनता हतबल झाली आहे.
चंद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्यां शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आहे. चंद्रावरील विवरांचा शोध घेणे सोपे की आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊनही जमिनीवरील खड्डे बुजविणे?

शेतकऱ्यांना, शिक्षकांना त्यांनी दावणीला बांधले आहे. त्यांना वाटते यापुढे संगोपन आणि संस्काराचे
 काम करायला आपले रोबोट आहेत. काँम्प्युटरवर गेम खेळावा तसा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. अशा बढाया मारणारे सोयीनुसार शहिदांना श्रध्दांजली देऊन मोकळे होतात. परंतू शहिदांच्या कुटुंबाला मंत्रालयात हक्कासाठी खेपा घालायला लावतात!
स्वतःला पुरस्कार घेताना वाहतूक व्यवस्था बंद करून झेड सिक्युरिटी साठी प्रशासकीय यंत्रणांवरील ताण वाढवून जनतेची कोंडी करतात. समाजप्रबोधन करणार्‍यांच्या सन्मानाचा दिखावा करण्यासाठी रखरखत्या उन्हात सोहळ्याचे आयोजन करताना लाखो अनुयायांच्या सुविधांच्या नियोजनाची जबाबदारी झटकतात. एकीकडे सुसंस्कृत, तत्वनिष्ठ, दूरदृष्टीचे 
जय जवान! जय किसान! घोषणामंत्र देणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, मिसाईल मॅन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तर दुसरीकडे देशाच्या संपत्तीवर अधाशा सारखे तुटून पडणारे कुपोषित मनोवृत्तीचे स्वार्थी, ढोंगी नेते!     
आज जनतेचे सेवक, आमदार, खासदार, मंत्री हे निःस्वार्थी भावनेने कार्यरत नसून जनसेवेच्या नावाखाली स्वहित साधण्यासाठी सत्ता स्पर्धेत गुंतून गेले आहेत! मतदारहो, आपण आता पूर्वीपेक्षा जास्त जागरूक होणे ही काळाची गरज आहे.
देशाचे संविधान वाचवण्यासाठी तसेच जनतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तरुणाईने निर्भीड पत्रकारितेसाठी पुढाकार घ्यावा हीच खरी आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला आदरांजली ठरेल.
आपली नम्र,
सुरक्षा शशांक घोसाळकर 
पवई,मुंबई.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी...


 महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचं खासगीत म्हटलं असल्याची माहिती आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका संदर्भात राज ठाकरेशी उद्धव ठाकरे संवाद साधण्यास तयार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी १९९० च्या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषण संग्रहित केलेली होती. त्या वेळी टीव्ही नसल्यानं भाषणं ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड केली जात असतं. १९९० पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं जर राज ठाकरेंकडे असतील तर मी त्यांच्याशी संवाद साधायला तयार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी खासगीत दिल्याची माहिती आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणं राज ठाकरे यांच्याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी आवश्यकता असल्यास राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी खासगीत केलं असल्याची माहिती आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात बोलताना जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत त्यांच्या मनात या गोष्टी येतात. आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन राज ठाकरे उचलतात. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी फोन उचलला जाणार नाही, असा विचार करु नये, असं संदीप देशपांडे म्हणाले. २०१७ ला आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यावेळी त्यांनी फोन उचलला नव्हता, असं संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटासोबत युती करायची की नाही, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा देखील पुन्हा जोर धरु लागलेल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीसंदर्भातील चर्चा फेटाळल्या होत्या.

Sandeep Kasalkar: केंद्रीय पत्रकार संघटनेत राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून डॉ. अर्जुन व्यास तर समन्वयक म्हणून हेमांग सोलंकी यांची नियुक्ती

Sandeep Kasalkar

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेत डॉ. अर्जुन व्यास यांची राष्ट्रीय प्रवक्ते तर हेमांग सोलंकी यांची राष्ट्रीय समन्वयक म्हणून संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अर्जुन व्यास हे संस्कृत भाषेचे शिक्षक असून आतापर्यंत जगभरात त्यांचे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील आयपीएस अधिकारी, इंजिनियर्स, इतर सरकारी अधिकारी, शाळा कॉलेजातील विद्यार्थी, गृहिणी, वृद्ध वयस्कर यांचा समावेश असून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत संस्कृत शिकवले जाते.
तर हेमांग सोलंकी हे आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन.ए.इ.एम.डी. या इव्हेंट मॅनेजमेंट शिक्षण संस्थेत आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. दरम्यान या शिक्षण संस्थेत पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संघटनेत सामावून घेणार असल्याचे सोलंकी यांनी सांगितले आहे. सोबत संपूर्ण भारतात देखील त्यांचा पत्रकारितेशी संबंधित असलेला जनसंपर्क आहे. त्यामुळे संघटनेचे जाळे हे संपूर्ण भारतात पसरविण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेन असे सोलंकी यांनी सांगितले आहे.
दरम्यान राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून पत्रकारांच्या समस्या, त्यांची तळमळ शासन दरबारी पोहोचविण्याचे काम करणार तसेच पत्रकारांची आर्थिक बाजू कश्याप्रकारे अधिक भक्कम करता येईल या बाबत सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे सी.पी.जे.ए. वृत्तवाहिनीची लवकरच आपण सुरुवात करू की जेणेकरून संघटनेच्या संपूर्ण भारतातील पत्रकारांना सर्व भाषांमध्ये रीपोर्टिंग करता येईल असे डॉ. व्यास यांनी सांगितले आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राची पुनर्बांधणी करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे. नुकतेच सांगली, अहमदनगर व जालना येथील कार्यकारिणी पूर्ण झाली असून इतर जिल्ह्यांमधील सध्या कार्यरत असलेली कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे आणि नवीन कार्यकारिणी बनविण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कसालकर यांनी सांगितले आहे.

आईपण भारी देवा...


आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर असे म्हटले जाते. आई हा शब्द उच्चारला की मनात वात्सल्याचा पाझर फुटतो. ती प्रत्येकाच्या जीवनातील वरदान आहे. असे असताना समाजात घडणाऱ्या विपरीत घटनांना नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधितांच्या आईला जबाबदार धरले जाते. 

जेव्हा परिसरात ८ व्या महिन्यात गर्भपात केलेले तेही मुलगा असलेले अर्भक गटारात फेकलेले आढळते तेव्हा संवेदनशील मनाला यातना होतात आणि आश्चर्यही वाटते. एकीकडे महिलांवर बलात्कार होतात तर दुसरीकडे महिला कशा वागतात? याचा विचार करून आपल्या पैकीच एका स्त्रीच्या क्रूर कृत्याची लाज वाटते. आधुनिकतेकडे आकर्षित होणाऱ्यांनी या घटनांचे दुष्परिणाम गांभिर्याने लक्षात घेतले पाहिजेत. समाजात कुमारी मातांचेही प्रमाण वाढत आहे. एक हात कमरेत आणि दुसऱ्या हाताने सिगारेटचा धूर हवेत सोडणारा, एक हात खांद्यावर आणि दुसऱ्या हाताने दारूचा पेग घेणारा प्रियकर मुलींना लयभारी वाटतो. कारण मुलीने बापालाअगोदरच प्रेम प्रकरणातील खलनायक ठरविलेला असतो. आईला नेहमी प्रमाणे गृहीत धरले जाते. आई होणे खरच इतक सोप आहे का? आईपणा बरोबर मुलांचे संस्कार , संगोपन , सुरक्षिततेची जबाबदारी तिला पेलवायची असते. आई होण्याची चाहूल लागते तेव्हा स्त्री आनंदाने भारावून जाते. त्याच बरोबर शरीरात होणाऱ्या बदलांनी अंतर्बाहय हेलावून जाते. गर्भधारणे पासून प्रसूती पर्यंतच्या वेदना ती निमूटपणे स्विकारते कारण तिला मूल केव्हा होणार? या प्रश्नाने आप्त-स्वकीयांनी भंडावून सोडलेले असते. त्यांची तोंड तात्पुरती बंद झालेली असतात. मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या स्त्रीला सतत आपल्याला होणारे बाळ कसे असेल? कसे दिसेल? प्रसूती व्यवस्थित होईल का? मला त्रास झाला तरी चालेल पण माझे बाळ निरोगी जन्माला यावे अशी तिची माफक इच्छा असते. तिच्यासाठी तो आनंददायी व अविस्मरणीय क्षण असतो. प्रसूती होईपर्यंत सर्वांनाच मुलगा की मुलगी होणार याबद्दल उत्सुकता असते. आपल्या देशात अजूनही लिंग भेदाला सामोरे जावे लागते. पहिली मुलगी जन्माला आली किंवा सर्व मुलीच असलेल्या स्त्रीला समाजात टोमणे ऐकावे लागतात. त्यापेक्षा भयंकर स्थिती तृतीयपंथी, दिव्यांग मूल जन्माला आलेल्या आईची असते. आई मुलांमध्ये भेदभाव करू शकत नाही.अजूनही तृतीयपंथी आणि दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित आहे. त्यांना योग्य न्याय देताना आईला कौटुंबिक आणि सामाजिक कोंडीही सहन करावी लागते.

सर्वसामान्य मुलांच्या लैंगिक विकासाच्या दृष्टीने विषय, प्रकल्प असतात . परंतु असामान्य मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अजूनही जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. अशा मुलांकरीता आई ही दिपस्तंभ असते. स्वतःला विसरून तिला या मुलांच्या शारिरिक, मानसिक , बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या भविष्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करूनही आज देशात विविध क्षेत्रात मेहनतीने, प्रामाणिकपणे ही मुले नेतृत्व करीत आहेत. त्यासाठी आईने प्राथमिक शरीरशास्त्रा पासून सुरूवात करून व्यापक अर्थाने जीवन शिक्षणा पर्यंत मेहनत घेतलेली असते. याउलट निसर्गाने कृपा केलेली स्मार्ट मुले आज भरकटलेली दिसतात. विविध माध्यमांमुळे मुलांमध्ये लैंगिक जाणिवा विकसित होत आहेत. मुलांना लवकर येणारी समज हा सर्वसामान्य पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. विधि आयोगाच्या सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या किमान वयोमर्यादे बाबत केंद्राकडून सूचना मागविल्या आहेत. सद्या ही वयोमर्यादा १८ वर्षे आहे ती १६ वर्षे करावी अशी मागणी जोर धरत आहे. विधि आयोगाने महिला आणि बालविकास मंत्रालयाकडेही त्यांचे मत मागितले आहे. तर दुसरीकडे प्रसूती दरम्यान माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बालविवाह हा गुन्हा असा विरोधाभास पहायला मिळतो. यामध्ये प्रत्यक्ष दुष्परिणाम सहन करावे लागतात ते स्त्रीला. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलीच्या संगोपना सोबत तिच्या संरक्षणाची आणि समुपदेशनाची भूमिका आईलाच निभवावी लागते.   मुलगी वयात येते तेव्हा आई काळजीपोटी तिला राहण्याच्या सहलीला जाणे, मुलांसोबत खेळणे, पोहणे, पाय पसरून बसणे, अनोळख्या ठिकाणी जाण बंद करायची. शरीरा विषयी बोलणे घरामध्ये मान्य नव्हते . परंतू आता मुलीला अस्वस्थ करणारे, बुचकळ्यात टाकणारे, विचारात पाडणारे किंवा उध्वस्त करणारे अनेक अनुभव, प्रसंग, व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊ शकतील त्यांच्यापासून सावध रहा अशी सांगणारी अल्पशिक्षित आई आधुनिक मुलींना मागासलेल्या विचारांची वाटते.

शारीरिक दृष्ट्या स्री पुरूषां पेक्षा जास्त बळकट असते. सारख्याच परिस्थितीत वाढविल्यास मुली मुलांपेक्षा सहनशील असतात आणि जास्त वेदना सहन करू शकतात . जास्त खंबीरपणे आयुष्याशी सामना देऊ शकतात . वयात येताना मुलींची मानसिक अवस्था नाजूक हळवी होते. त्यांना मुलांबद्दल खूप आकर्षण वाटू लागते. मुलांच लक्ष वेधून घ्याव, सिनेमे पहावेत, शरीराचा सारखा विचार करावा, त्याविषयी बोलावे अशा सारख्या प्रवृत्ती या वयात मुलींमध्ये उफाळून येतात. व काही मुली खुप टोकाच वागतात. निसर्गाने दिलेल्या शक्तीचा गैरवापर न करता तिचा आदर राखायला आपल्याला जी शिकवते तिलाच संस्कृती म्हणतात . 

वयात येताना आईशी मुलीचे संबंध अगदी मोकळेपणाचे हवेत आणि ती जे सांगेल ते आपल्या हिताचेच असेल असा विश्वासही हवा. सुमारे अठरा वर्षाच्या आसपास तिचे शरीर आईपणास समर्थ होते. त्यापूर्वी मुल होण म्हणजे तिला बाळंतपणाचा धोका, तिच्या मुलपणावर बंधन आणि पुढे जन्मणार मुल कितपत सशक्त असेल या विषयीही शंका म्हणून  तर आपल्या शासनाने, कायदयाने मुलीच्या लग्नाच किमान वय अठरा वर्षे ठरवलेले आहे. ती अट खुद्द मुलीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्याही हिताचीच आहे. आज शहरांमध्ये चांगल्या प्रतिष्ठित वस्त्यांमध्ये, रस्त्यांवर, कचरा कुंड्यांच्या आसपास, गटारात मासिक पाळीच्या रक्ताळलेल्या घड्या खुशाल भिरकावून देतात. त्याच प्रमाणे रक्तामासाचं अर्भक फेकून देण्याचा कल वाढलेला आहे. याला काय सुसंस्कृतपणा म्हणतात? घरातील पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तरी त्याला विधिपूर्वक दफन केले जाते.

इंग्रजी चित्रपट, मासिक , कथा कादंबऱ्या मधिल अवास्तव चित्रणाने शरीराची व मनाची गरज टोकाला गेल्याने कामेच्छा पूर्ण करण्यासाठी अचाट आणि अफाट कल्पनांमुळे उत्तेजित होणाऱ्या मुलांपेक्षा मुली जास्त भावनाप्रधान असतात या सर्वसामान्य प्रवृत्ती आहेत. परंतू आपल्याला माणसा सारख किमान सुसंस्कृत, विचारी, समतोल आयुष्य जगायच आहे इतपत भान युवक युवतींना शाळा महाविद्यालयातील शिक्षणाने येणार नसेल तर ते ज्ञान काय कामाचे? अर्थात मुलामुलींनी एकत्र वावरण्यात काहीच धोका नाही . मग एकत्र जगायच असेल तर पुरेशा माहितीनिशी, पुरेशा खबरदारीनिशी का जगू नये? पालकांना मित्र मैत्रीणीं सोबत सहलीला जातो, गणपती, नवरात्री सारख्या मंगल प्रसंगी फिरायला जातो अस खोट सांगून त्यांचा विश्वासघात करताना हल्लीच्या तरूणाईला काहीच वाटत नाही ? अजूनही आम्ही शिक्षणाने माणूस समृद्ध होतो या भ्रमात आहोत असे वाटते. यांना जिवशास्त्र शिकवल जीवनशास्त्र कोण शिकवणार? त्रिकोण , चौकोन, षटकोना पेक्षा महत्वाचा  आहे आयुष्याचा दृष्टिकोन. विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वांची कारण व्याकरणा पेक्षाही अंतःकरणाची भाषा असते महत्त्वाची. लेकराला पाॕकेटमनी, बाईक अन भलेही दिली जरी कार किती छान झाल असत जर दिले असते संस्कार  अशा आशयाची वाचनात आलेली कविता ह्याला आयुष्य म्हणाव काय? ही अशा प्रसंगी तंतोतंत पटते.

या वागण्याला केवळ तरूणाईला दोष देऊनही प्रश्न सुटणार नाहीत कारण लिव्ह इन रिलेशनशीपच फॕड वैवाहिक जीवनाचा आस्वाद घेतलेल्या दोन मुले असणाऱ्या जोडप्यां मध्येही वाढत आहे. आपल्याला अनेकदा भूक लागते आणि अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्या आसपास असतात. पण म्हणून काही दर भुकेला चोरून , बळजबरीने किंवा दुसऱ्यापुढच अन्न ओढून आपण आपल्या पोटाची तरतूद करत नाही . तर आपली भूक आटोक्यात रहावी आणि सन्मानाने भागवता यावी असे व्यवस्थापन शास्त्र अत्यंत दारिद्रयात दिवस काढणारी आई शिकवत असते. मग केवळ पैसा आणि कामशास्त्राच्या आहारी जाऊन आईच्या संस्कारांची कमी असा आपल्या आईचा उध्दार करायला लावणे केव्हातरी थांबणार आहे का? 

आपल्या बाळाच्या ओढीने व्याकुळ होऊन अवघड कडा पार करणारी हिरकणी सर्वश्रुत आहे.

असा आपला इतिहास असताना  पोटच्या गोळ्याला नाल्यात फेकून देणारी आई कुठून तयार झाली?

वर्षभर बेभान होऊन नाचा पण कधीतरी समाजसुधारक सावित्री बाई फुले, अनाथांची माय सिंधूताई  सपकाळ यांना वाचा. केवळ एक दिवस मदर्स डे साजरा करण्यापेक्षा आईपणाचे महत्व प्रत्येक पाऊल उचलताना स्मरणात ठेवा. जिथे चुकतय तिथे खर बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही  पण आईच्या मनाला नक्की समाधान मिळेल. गर्भातील बालकांचा मृत्यू टळेल ही माफक इच्छा. जय हिंद !


आपली नम्र,

सुरक्षा शशांक घोसाळकर

पवई, मुंबई .

संस्कृती संवर्धन की अधःपतन?

अजूनही कित्येकांना बालभारतीचे पुस्तक आठवले की बालपणीच्या आठवणीं मध्ये हरवून जायला होते. त्यातली बडबड गीते, गोष्टी बालमनावर हसत खेळत नकळतपणे संस्कार करण्याचे काम करायचे. बालपणीच्या राजपुत्र आणि राजकुमारीच्या कथां मधला बेडूक आठवतोय? जो राजकुमारीच्या पहिल्या प्रेमाच्या चुंबनाने शापित राजकुमाराला मानवी रूपात परत येणारा. मग आताच्या आधुनिक सतत बदलत्या जीवनशैली प्रमाणे आधुनिक संस्कृतीचा कोणताही प्रकार अंगीकारण्याची क्रेझ असलेल्या राजकुमारी राजकुमाराचे परिवर्तन राक्षसी प्रवृत्ती मध्ये का होत आहे? याचा गांभीर्याने विचार करून शैक्षणिक , सामाजिक व कायदेविषयक बदल होणे अत्यावश्यक आहे. सद्याच्या सोशल मिडीया, कथा, चित्रपट आणि विशेषतः मालिकांनी सगळच रोमँटीक व रोमांचक केले आहे. माहितीचा अभाव, गोष्टीचे पूर्ण ज्ञान नसताना प्रयोग म्हणून प्रेम करणे, प्रेमाची, नाते संबंधांची समज अपरिपक्व असल्याने ब्लाइंड डेट मुळे दुर्दैवी अपघात होत असलेल्या विकृत घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 
रिलेशनशिप म्हणजे नाते संबंध होय. भावनिक दृष्ट्या कमकुवत असल्याने एखाद्या बद्दल आकर्षण वाटून प्रेमात पडणाऱ्यांना नाते म्हणजे काय? हे जाणून घेण्याची गरज आहे. ज्यात कौटुंबिक , सामाजिक , व्यावसायिक , प्रेमाच्या नाते संबंधांचा समावेश होत असतो. कमिटेड रिलेशनशिप म्हणजेच वचनबध्द नाते संबंध. ज्यात आपल्या जोडीदाराला जीवनभर एकमेकां सोबत राहण्याचे एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिलेले असते.   
अठरा वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती मुलगा किंवा मुलगी किंवा समलैंगिक जोडीदारा सोबत स्वतःच्या संमतीने लग्न न करता एकत्र राहण्याच्या पद्धतीला लिव्ह इन रिलेशनशिप हे गोंडस नाव दिलेले आहे. विधीमंडळ या नात्याला वैध मानते. सर्वोच्च न्यायालयाने या नात्या संदर्भात २०१३ मध्ये मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायदेशीर मान्यतेनुसार दोघांमाध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. रिलेशनशिप मध्ये मुलाचा जन्म झाला तर तो वैध ठरतो. भारतीय पत्नीला घटनात्मक दृष्ट्या दिलेले सर्व कायदेशीर अधिकार लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही आहेत. नाते जपताना मानसिक , वैचारिक , भावनिक , आणि सामाजिक परिणाम लक्षात ठेवून आर्थिक स्थिती सुधारणे अभिप्रेत आहे. परंतू नियम न पाळणे , नैतिक जबाबदारी न घेणे हेच निर्माण होणाऱ्या समस्यांचे मूळ आहे. तसे न केल्यास त्याचे टाॕक्सिक रिलेशनशीप म्हणजे विषारी तसेच त्रासदायी नाते संबंध जे नाते आपणास त्रास देत असेल ज्यात राहून फक्त मनस्ताप सहन करावा लागत असेल असे रूपांतर होते. त्यासाठी शालेय शिक्षणात संबंधांचे व्यवस्थापन करण्याचे, शरीर धर्माचे ज्ञान मुला मुलींना देणे महत्त्वाचे आहे. मुलीच शिक्षण प्रगतीचे लक्षण या धारणेने शिक्षणाला प्रोत्साहन दिले गेले परंतू महिलांची बिघडलेली दिशा पाहून संस्कार देण्यात कमी पडलो असे वाटते. 
जो विषय घरचे लोक हाताळू शकत नाहीत ते विषय शाळेत हाताळले गेले पाहिजेत. प्रत्येकाला गरज असते ती प्रेमाची व विश्वासाची. विद्यार्थी हा माझा पाल्य आहे असे समजून वयात येणाऱ्या मुलांना नजरेतून वात्सल्य देऊन त्यांच्या शंकांचे निरसन तसेच होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांना वास्तवाचे भान ठेवून नियंत्रण कसे ठेवावे याचे कौशल्य ज्ञान देणे महत्वाचे आहे. याकरिता वयात आलेल्या मुलांच्या पालकांचे वर्षातून कमीतकमी ४ वेळा प्रबोधन वर्ग घेतलेच पाहिजेत. मुलांचे प्रशिक्षण जितके महत्त्वाचे आहे. त्याच्या दहापट जास्त पालकांचे प्रबोधन होणे नितांत गरजेचे आहे.कित्येक पालक आपल्या धुंदीतच जगत आहेत. स्वतः सोबत इतरांचा विचार करणाऱ्या दुसऱ्याला सहकार्य करण्याची भावना असणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ झाल्या आहेत. 
संगणकाच्या युगात आधुनिक क्रांती झाली. मर्यादे पेक्षा जास्त पैसा मिळायला लागला. माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील ऐवढे मेहनत करून पैसे कमवणा-या कुटुंबवत्सल व्यक्ती इतिहास जमा झाल्या. टेलिकम्युनिकेशन वाढले परंतू कुटूंबातील अंतर्गत कम्युनिकेशनचे काय? पैसे कमविणारी मुलमुली पैशाला सर्वस्व मानून आता मला कोणाची गरज नाही असे म्हणत कुटुंबाला नगण्य स्थान देतात. त्यामुळे कुटुंब संस्था उध्वस्त व्हायला लागली. परंतू देह धर्मासाठी उच्च शिक्षित कुटुंबा मध्ये लिव्ह इन रिलेशनशीप संस्कृती जन्माला आली. भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. कुटुंब संस्कृती मध्ये एकमेकांची काळजी घेणे ही भारतीय परंपरा आहे. याला छेद देण्याचा प्रकार पाश्चिमात्य संस्कृतीच अंधानुकरण करणाऱ्या शिक्षितांनीच आपली संस्कृती पायदळी तुडविण्याचे काम केले. चैनीसाठी पैसा मिळविणे महत्वाचे मानले. मानवाची सवय आहे झाकून ठेवले की वाकून पहायचच. त्यामुळे शरीर सुखाची उत्सुकता वाढून पैसे हातात असल्यामुळे मजबूती मिळाली. एकमेकांची जबाबदारी टाळणे, समाज मान्यतेने एकत्र न आल्याने एकमेकांच्या वर्तनावर अंकुश न राहिल्याने वादाचे प्रसंग उदभवतात. त्याचे रूपांतर निर्घुण हत्येत झालेले पहायला मिळते. विभक्त कुटुंब पध्दती प्रमाणेच फ्लॕट संस्कृती मध्ये शेजारच्या व्यक्तींशी संपर्क नसल्यामुळे धोका वाढला आहे.
माणूस हा हल्ली खूप एकलकोंडा 
झाला आहे. कोणाशी संवाद नाही. 
चांगले मित्रपरिवार नाही. 
माणूस समाजशील राहिला नाही. 
प्रेम ,बंधुता ,आपुलकी लोप पावत चालली आहे. आपल्या भारत देशाची ही संस्कृतीच नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे. 
 हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जगण्याच्या पद्धतीमुळे अशा सर्व गोष्टींना पेव फुटतात. जर मूल लहानपणा पासूनच आजी-आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळेल, संस्कारांमध्ये वाढेल, त्याला माया मिळाली तर तो पुढे समाजाला माया देईल.
 लिव्ह इन रिलेशनशीप सारखे बहुमताने कायदे करणाऱ्यांनी या घटनांची भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी नैतिक जबाबदारी स्विकारली पाहिजे. 
गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा कालावधी लांबला तर त्याची तीव्रता कमी होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसावर वचक बसत नाही . छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण स्त्रियांचा आदर करा. हे सर्व कुठेतरी विसरत चाललो आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजां सारखी गुन्ह्याची तीव्रता पाहून मानवी देहाला इजा करणाऱ्याला, लैंगिकतेच्या प्रवृत्तीला सजा देण्याची पध्दत अमंलात आणली पाहिजे. गुन्हेगाराला कारागृहात फुकटचे पोसून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांना वेठीस धरण्यापेक्षा कमीतकमी कालावधीत वेळप्रसंगी जाहीर शिक्षा करणे या सारखे कायद्यात बदल होणे आवश्यक आहेत. सत्ता स्थापनेसाठी रातोरात बहुमत सिध्द करण्यासाठी वेळ देणारे राजकारणी या वाढत्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. जिथे विवाहित स्त्रीला अपरिचित व्यक्तीने पाठविलेल्या अश्लील संदेशा करीता न्याय मागताना फाॕरेनसिक लॕबचा अहवाल मिळायला दहा वर्षे लागतात तर अन्य पिडीतांबाबत विचार न केलेला बरा. अशा या न्याय प्रक्रीयेमध्ये जो पर्यंत बदल होत नाहीत तो पर्यंत सर्वांनी एकत्रितपणे सांविधानिक मार्गाने उठाव करायलाच हवा. नाहीतर हा वणवा आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.
भारतीय दंड संहिता अंतर्गत महिलांसाठी सुरक्षितता आणि आरोपीला जबरदस्त शिक्षा दिली गेली पाहिजे.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आपले कायदे आरोपींना शिक्षा करायला योग्य वाटत नाहीत. शंका कुशंका काढून शिक्षेला पळवाटा शोधून तो मी नव्हेच असे घडते. गंभीर गुन्हे करून जामिनावर सुटून सुद्धा पुन्हा आपली दहशत माजवतात व पुन्हा अतिशय गंभीर गुन्हे करतात अशा गुन्हेगारांना आपल्या कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे संविधानाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान कायदे आहेत त्यात आता सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. गुन्हेगारांना विद्यमान कायद्यांची भीती वाटत नाही हे सिध्द झालेले आहे.
       लहान बालक, कन्या, महिला, वृद्ध यांची हत्या करणार्‍या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. हे आता कायदे मंडळाने मान्य करावयास हवे. विविध टीव्ही मालिका, चित्रपट यामधून गुन्हेगारीला प्रवृत्त करणार्‍या घटना प्रदर्शित करण्यास सेन्साॕर बोर्डाने लाचखोरीने मान्यता देता नये. गुन्हेगारीचे हे आधुनिक प्रकार याच माध्यमातून जनते पर्यंत पोहोचतात. अशा विकृतींसाठी जबाबदारीचे भान नसलेली प्रसार माध्यमे, टीव्ही न्यूज चॕनल, सोशल मीडिया आणि पाहणारे ही तेवढेच जबाबदार आहेत.
त्यामुळे सरकारने याप्रकरणी कडक पाऊले तात्काळ उचलली पाहिजेत. मग ते सरकार कोणत्याही राजकिय पक्षाचे असो.
       लीव्ह इन रिलेशनशीप या घटनेकडे पाहता महिलांसाठी सुरक्षितता काय? कायद्यात सुधारणा करावी अशी जाहीर मागणी सर्व जनतेने केली पाहिजे.

आपली नम्र
सुरक्षा शशांक घोसाळकर
पवई, मुंबई

Love you Pancham - A special tribute by Kavita Krishnamurti | 23rd June 2023

मोरया एंटरटेनमेंट आणि रेड डायमंड मिळुन दिनांक २३ जुन सायंकाळी ७ वाजता सायनच्या षण्मुखानंद हाॕलमधे " लव्ह यु पंचम " हा प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या गीतांचा कार्यक्रम जगप्रसिद्ध तालवाद्य संयोजक नितीनशंकर यांच्या अधिपत्याखाली सादर होणार आहे. ह्या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायीका कविताकृष्णमुर्ती यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याबरोबर गायक - अलोक काटदरे, मोहोम्मद सलामत,मकरंद पाटणकर, गायीका - प्रियांका मित्रा, अभिलाषा , ज्योतीशंकर यांचा सहभाग लाभणार आहे. तसेच सिनेसंगीत क्षेत्रातील दिग्गज वादक अनुपशंकर,सुराज साठे ,विजय जाधव , पंकज गुप्ते , अभिजीत कोळी, इव्हान मन्स,अरविंद हळदीपूर , मोहोम्मद शादाब, गणेश थोरात , किरण गायकवाड,अमित भवर , अनिकेत हे साथसंगत करतील . तसेच सुत्र संचालन आर.जे. अनमोल करतील तर रेकाॕर्डीस्ट म्हणुन कैलाश कदम असतील.कोरस गान शिल्पा आणि समुह असेल

Kya News च्या अनावरण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती; आता संस्कृत भाषेमध्ये सुद्धा Kya News वर मिळणार बातम्यांचे अपडेट्स

अल्पावधीतच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्रात आपले ठसे उमटवणाऱ्या Kya News (Know Your Area) या ऍपचा अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच वेधशाळा संस्कृतचे अध्यक्ष डॉ. अर्जुन व्यास यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील शिर्डीत पार पडला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी १०० हुन अधिक पत्रकारांची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी Kya News च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या चारोळ्या. दरम्यान Kya News चे देवेश गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधत ऍप विषयी अधिक माहिती दिली.
दिवसरात्र एक करून पत्रकार हा बातमी गोळा करण्याचे काम करत असतो. दरम्यान अपुरे मानधन आणि त्यात जाहिरात मिळविण्यात पत्रकारांची होणारी दगदग यामुळे पत्रकारांना कधीकधी नैराश्याला सामोरे जावे लागत असते. या संपूर्ण समस्यांचा गांभीर्याने विचार करून Kya News ऍप चे संस्थापक देवेश गुप्ता यांनी संपूर्ण भारतातील पत्रकारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या ऍप ची निर्मिती केली. त्यामुळे आता Kya News ऍप मध्ये बातम्या टाकल्यावर पत्रकारांना दर महा आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे देवेश गुप्ता यांनी सांगितले आहे. बातम्यांना जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे मानधन असे या ऍप चे मुख्य वैशिट्य आहे. त्यामुळे आता पत्रकारांची आर्थिक बाजू विकसित करण्यामध्ये आमचा खारीचा वाटा असेल असे गुप्ता यांनी या वेळी सांगितले आहे.
या प्रसंगी वेधशाळा संस्कृत वाहिनी देखील Kya News वर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे आता Kya News वर या पुढे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेसोबत संस्कृतमध्ये देखील बातम्यांचे अपडेट्स मिळणार असल्याचे वेधशाळा संस्कृतचे अध्यक्ष डॉ. अर्जुन व्यास यांनी सांगितले.
दरम्यान उत्कृष्ट पत्रकार, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उपस्थित समस्त पत्रकारांचे मार्गदर्शन केले आणि Kya News च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.

Central Press Journalists Association's 3rd anniversary celebration

Shri Suresh Khade ji, Hon’ble Cabinet Minister of Maharashtra, will attend the Central Press Journalists Association's (CPJA) 3rd anniversary

Mayor, MLA, Police Chief, veteran journalists and other dignitaries will also be present on the occasion

Major announcements will also be made for the development of journalists including the launch of Kya news app for the journalists from Maharashtra

Special Correspondent
Central Press Journalist Association, is a national association dedicated to the advancement of the entire journalist community. The 3rd anniversary of this association will be celebrated on April 16, 2023 at Sangli, in the presence of Shri Suresh Khade ji, Hon’ble Labor Minister of Maharashtra and the Guardian Minister of Sangli District.

Since its inception, CPJA has worked for the development of journalists with various initiatives. Even during the Covid pandemic, the office bearers of the association from different states, had come down to the ground level and provided various types of services to the masses, such as medical services, household useful items amongst others.

"This association is my family, and as the head of the family, I am willing to do whatever is required for the development of the journalists community. We are already receiving encouraging responses and we are planning to take our initiatives in each of the districts of India in coming times, starting from Maharashtra and helping all the journalists in our family. ", said Sandeep Kasalkar, the CPJA's National President and Founder.

The anniversary celebration on 16 April 2023 will also be attended by veteran journalists from print and electronic media from across Maharashtra. The ceremony will start at 10:30 am. The said program will be held at Vishram Bagh, Khare Sanskritik Bhavan in Sangli and the chief guests on this occasion are Hon’ble Labor Minister, Maharashtra and Guardian Minister of Sangli District Shri Suresh (Bhau) Khade, MLA Shri Sudhir (Dada) Gadgil, Mayor Shri Digvijay Suryavanshi, District Bank Vice President Smt. Jayashree Tai Patil, Congress Party District President Shri Prithviraj Patil, District Police Chief Shri Basavaraj Teli and Senior Journalist Shri Dhananjay Pathak. And also Gupta, the founder of the national news app Kya News, and Director Shri Gaurav Shetye will be present on this occasion. The entire program has been organised and headed by Shri Chandrasekhar Kshirsagar and team, a distinguished journalist of Sangli district.

On this occasion, important announcements will also be made regarding various initiatives for the development of journalists, new office bearers of CPJA and the launch of Kya news app for the journalists from Maharashtra.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ठिकठिकाणी जल्लोषात साजरी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवराय मित्र मंडळातर्फे आंबोलीच्या केवणी पाड्यामधील निराधार महिलांना धान्य वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष निशांत राजेंद्र दळवी यांची होती तर यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग आंब्रे, विभाग संघटक अनिल दळवी, उपविभाग प्रमुख हारून खान, समाजसेविका पन्ना पांचाळ, शाखाप्रमुख कल्पना कोकने, युवा अध्यक्ष मोहित पेडणेकर, राधिका दळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराय मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळातर्फे शिवजयंती उत्सव आदर्श नगर, इंडियन ऑइल पेट्रोल पंपसमोर, न्यू लिंक रोड, जोगेश्वरी (पश्चिम) येथे साजरा करण्यात आला. 
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रं.61 (उपशाखा अध्याक्ष) कमलाकांत बिरमोळे व महाराष्ट्र सैनिक गणेश पाटील, यश कुडतरकर, मनोज यादव, किरण भोईर, विनोद गुरव, सलीम खान, प्रशांत तांडेल उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा क्रमांक 45 चे शाखाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या संकल्पनेतून रत्ना नाका, ललित हॉटेलच्यासमोर, गोरेगाव पश्चिम येथे शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

अवघ्या ४ दिवसांत होन्डा सिटी कार हस्तगत करण्यात अंबोली पोलिसांना यश

संदिप कसालकर
मुंबई: अपहार केलेली होन्डा सिटी मोटर कार अवघ्या ४ दिवसांत हस्तगत करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे. 
मोटार वाहन अपहार केल्याचा गुन्हा ४ दिवसांत उघडकीस आणुन आरोपीतासह मालमत्ता हस्तगत केल्याबाबत 
अनुस्तिती अनिमिष सरकार यांनी त्यांची होन्डा सिटी कार आसाम राज्यात पाठविण्यासाठी वीआरएल लॉजिस्टीकला ऑनलाईन संपर्क केला आणि त्यासाठी लागणारे शुल्क हि पाठवले. वीआरएल लॉजिस्टीकचा कार चालक अविलाश शर्मा याने खोटी कारणे सांगत अनुस्तिति यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले आणि आसाम राज्यात न जाता कारचे अपहरण केले. अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच अवघ्या ४ दिवसांत गाडी हस्तगत करत आरोपी अविलाश ला कलम ४२०, ४०६ भादवि अंतर्गत ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान अविलाश कडून फिगो फोर्ड कार व हुंदाई एसेंट अशा इतर दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
हि संपूर्ण यशस्वी कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, परमजितसिंह दहिया, परिमंडळ - ९ चे पोलीस उप-आयुक्त अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओशिवरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुर्यकांत बांगर, अंबोली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे, गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक अब्दुल रउफ शेख यांच्या नियोजनबध्द देखरेखीखाली पोलीस उप निरीक्षक रामेश्वर ठाणगे, पोह. विलास दुलम, प्रकाश नागे, संदीप सावंत, पोशि शिवाजी कासार, सुनिल घुगे, निखिल बाबर, संदीप सांगळे यांनी केलेली आहे.

"राणी लक्ष्मीबाई पुरस्कार" मिळाल्याबद्दल 'अपेक्षा सुतार' सारख्या खेळाडूंमागे सरकारचे पाठबळ राहील" म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तिचा घरी जाऊन केला सत्कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  रत्नागिरी येथील अपेक्षा सुतार सारखे खेळाडू क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील तर त्यांना आमचे सरकार नक्की पाठींबा देईल. क्रीडा विभागाच्या कोट्यातून सरकारी नोकरीत सामावुन घेऊ. तिच्यासारखे खेळाडू निर्माण होणे ही रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

  उस्मानाबाद येथे झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिला गटातून महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करत देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा 'राणी लक्ष्मीबाई पुरस्कार' पटकावणार्‍या अपेक्षा सुतार या गुणवान खो-खो पटूचा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तिच्या कुवारबाव येथील घरी जाऊन सत्कार केला. 

  दि.२८ रोजी सोमवारी सायंकाळी कुवारबाव येथील सुतार यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. पुरस्कार प्राप्त अपेक्षाला मंत्री सामंत यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. याप्रसंगी अपेक्षाचे वडील अनिल सुतार, तिची आई, भाऊ आणि सुतार कुटूंबीय, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू साळवी, संतोष कदम, फैय्याज खतिब, उल्का पुरोहित,  कुवारबाव मधील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

  याप्रसंगी सुतार कुटूंबियांतर्फे पुष्पगुच्छ देऊन मंत्री सामंत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंत्री सामंत यांनी स्वतःहून अपेक्षाचा केलेला हा गौरव तिच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे सुतार कुटूंबियांतर्फे उल्का पुरोहीत यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांच्या पाठींब्यामुळे आज रत्नागिरीत सर्व मैदानी खेळांमध्ये विविध खेळाडू यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

  याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, अपेक्षा सुतार हीचे अभिनंदन करत असतानाच तिच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन करत आहे. महाराष्ट्राचे क्रिडाक्षेत्रातील प्रतिनिधीत्व करण्याची संधी अपेक्षाला मिळाली ही रत्नागिरीकरांचे भाग्य आहे. अशी मुले क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील, तर आमचे सरकार त्यांना नक्कीच पाठींबा देईल. भविष्यात क्रीडाविभागचा कोट्यामधून नोकरीत सामावून घेण्यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्न करु. अपेक्षा सारखे खेळाडू निर्माण होत असतील तर रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या क्रीडासंस्कृतीच्या वाढीसाठी काळाची गरज आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

यजमान महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम; महाराष्ट्राच्या महिलांचे २४ वे अजिंक्यपद तर रेल्वेचे ११ वे अजिंक्यपद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राचा भारतीय विमान प्राधिकरण संघावर डावाने विजय मिळवत 
उस्मानाबाद येथे यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे.

  भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघाचा ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २ गुण), अपेक्षा सुतार (२.२o व १.१०मिनिटे व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडे हीने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दिपाली राठोड हीने २.३० मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (१.२० मिनिटे), जान्हवी पेठे हीने (१.०० मिनिटे व १ गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली.

पुरुषांमध्ये रेल्वेची हॅट्ट्रिक साधत ११ वे अजिंक्यपद, महाराष्ट्राला उपविजेतेपद तर कोल्हापूरला तृतीय क्रमांक

  भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे ११ वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास  एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायाचे होते. त्यांनी ७ गुण मिळवित हॅटट्रिक केली.
रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण), अमित पाटील (१.३० मिनिटे व १ गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली.
महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १गुण), प्रतिक वाईकर (१.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.
अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले सर्वोत्कृष्ट 

  अपेक्षा सुतार राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी तर अक्षय गणपुले एकलव्य पुरस्कारचा मानकरी ठरला. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे  पुरस्कारप्राप्त पुरुष व महिला खेळाडूना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, आमदार श्रीकांत भारतीय, कल्याणराव काळे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, अभिनेत्री किरण डहाने, भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांच्या उपस्थितीत देण्यात आली. त्यांचे स्वागत डॉ. चंद्रजीत जाधव, रहिमान काझी व अनिल खोचरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.ज्योती वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आली.

सोलापूरचा रामजी कश्यप ठरला सर्वोत्कृष्ट संरक्षक
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू असे : 
अष्टपैलू : अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले
संरक्षक : रेश्मा राठोड, रामजी कश्यप
आक्रमक : नसरीन, विजय हजारे

स्वतंत्र मराठवाडाच नाही तर मुंबई ही केंद्रशासीत करू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी पवारांनाही लक्ष्य केले आहे.

  सदावर्ते यांनी यावेळी पवार चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले "शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिप्टा नावाची एकमेव कंपनी या भागात आणली. त्या तुप्पा भागातील कष्टकरी त्यांना मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यावेळी वेगळ्या पक्षाची कामगार चळवळ होती म्हणून ती शिप्टा कंपनीही बंद पाडण्यात आली. सामान्य लोकांना आवाज नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार व कुटुंब , शंकरराव चव्हाण व कुटुंब आणि विलासराव देशमुख व कुटुंब हेच मराठवाड्याचे मारेकरी आहेत. म्हणून आम्ही खनिजाच्या सर्वंकष अभ्यासानंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झाले पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो आहोत," असंही सदावर्तेंनी नमूद केलं. यावेळी मराठवाड्याला वेगळी वागणूक दिल्याचा आरोप करत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही मला पाठिंबा दिला आहे, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

  मुंबई वेगळी का हवी ? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबाईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४×७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे. अशी भुमिका मांडलीआहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.