BREAKING NEWS
latest
nyay ranbhumi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
nyay ranbhumi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जिजाऊ ज्ञान मंदीरचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

जिजाऊ ज्ञान मंदीरचे स्नेहसंमेलन उत्साहात !
(इस्लामपूर)
        जिजाऊ ज्ञान मंदीर प्रि- प्रायमरी स्कूल बहे, इस्लामपूर यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला. यावेळी शिवमती सुवर्णा दिलीप पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श समाज घडविण्यासाठी चांगल्या पुरोगामी विचारांची गरज आहे असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साम्यवादी विचारवंत काॕम्रेड धनाजी गुरव यांनी प्रतिपादन केले.इतिहास अभ्यासक प्रा. सचिन गरुड म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांचे शिक्षण घेण्याचा अधिकार काढून घेतले आहेत आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र यावे लागेल.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे चंद्रशेखर क्षिरसागर, दिलीप पाटील ,कापूसखेड गावचे सरपंच निवृर्ती माळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले. दिपप्रज्वलन व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या माता-पालक तसेच आजी-आजोबा यांच्या वेशभूषा, चिञकला, संगीत खुर्ची , उखाणा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. अनुष्का चव्हाण, तनुष नलवडे, संस्कार शेळके या आदर्श विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जिजाऊ वंदना, स्वागत गीत , नृत्य , अंधश्रद्धा व विज्ञान तसेच अभंगगाथेचे महत्त्व यासारख्या विषयांवर नाटक, शिक्षण काळाची गरज तसेच पाण्याचे महत्त्व यासारख्या सामाजिक विषयांवर भाषणे, मोबाईल की पुस्तक यावर एकांकिका इत्यादी सादर केले. 
     यावेळी स्वागत परिचय व प्रास्तविक संस्थेचे संस्थापक उमेश शेवाळे , कार्यक्रमाचा आढावा सौ. आशा खाडे , सुञसंचलन तेजस्विनी शेवाळे व कु. संस्कार शेळके, आभार सौ. मेघा लाड यांनी केले. रोहित तोरस्कर, दत्ताञय नलवडे, अमोल चव्हाण, कापूसखेडचे सरपंच निवृत्ती माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अजित हवलदार, उपाध्यक्ष विशाल धस,रोहिणी आरबुने, प्रियंका शिंदे, पुजा थोरात, वैशाली यादव , ऋतुजा पोवार, आदि शिक्षक , विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.

जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर आयोजित शेवगाव येथे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरवात.

जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर आयोजित शेवगाव येथे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरवात

संतोष औताडे- नेवासा दिनांक -10/01/2024 
    सविस्तर माहिती- जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर पुरस्कृत व महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्र आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शेवगाव येथील शितीज सोशल फाउंडेशन सिद्धिविनायक कॉलनी शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. आज दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षणासाठी  शितिज सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची सुवर्ण संधी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर व  महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्राने दिली आहे.या संधीचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी तसेच परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तात्यासाहेब जिवडे प्रकल्प अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांनी केले आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व जिल्हा उद्योग केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण ट्रेनर म्हणून तपाडीया मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रशिक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक होण्याची संधी मिळेल. केवळ प्रशिक्षण न देता महिलांना बाजार पेठ, मार्केटिंग,याचा सर्व्हे करून आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण महिलांना नक्कीच लाभदायी ठरनार आहे. या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी परिसरातील महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रशिक्षण कार्यक्रम शिबिरासाठी संतोष औताडे (पञकार) कार्यक्रम समन्वयक जिल्हा उद्योग केंद्र MCED अहमदनगर हे काम बघत आहे.

"मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण"

मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी *मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम उपस्थित पालकांचे स्वागत करून आपल्या मुलांना मराठी माध्यमातून प्रवेश घेऊन त्यांनी घेतलेला निर्णय किती अचूक योग्य आहे. याचे महत्त्व सांगण्यात आले. 

  जपान, फ्रान्स जर्मनी या तीन देशातील मुले जगावर राज्य करतात. कारण या देशातील पालक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिकवितात. हाच मुद्दा अधोरेखित करून उपस्थित पालकांनी घेतलेला मराठी माध्यमाचा निर्णय हा अत्यंत बरोबर व मुलांच्या मानसिकतेला धरून आहे याबाबत संकल्प संस्थेचे अध्यक्ष विष्णू बाळ धुरी सरांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा काडीचाही संबंध नाही हे याच शाळेतील अनेक माजी विद्यार्थी जे आज डॉक्टर, इंजिनिअर, सीए होऊन देशा परदेशात स्थायिक झाले आहेत त्यांची माहिती देण्यात आली. जी भाषा घरात बोलली जाते त्याच भाषेतून जर मुलांना शिकविले गेले तर मुलांचा केवळ बौद्धिक विकास नव्हे तर आत्मिक विकास सुद्धा होतो हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. "टिकवायचं जर असेल मुलांचं बालपण...तर मुलांना द्यायलाच हवे मातृभाषेतून शिक्षण," ही गोष्ट समस्त पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घराबाहेर पडल्यावर भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी पालकांनी सुरुवात मराठीतूनच करावी अस वचन उपस्थित पालकांकडून घेण्यात आले.


संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी मातृभाषेचे महत्त्व व त्यासोबतच विद्यार्थी, महिलांनी सुरक्षिततेच्याबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत अचूक मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुख्याध्यापिका सुविधा शिर्के यांच्या मार्गदर्शनाने शिक्षिका स्मिता मोरे व
स्नेहल गावडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुकेश अंबानींना चार दिवसांत तिसरी धमकी : मागणीची रक्कम वाढली 400 कोटी रुपये, ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले- देशाच्या सर्वोत्तम शूटर कडून मारण्याची धमकी...

मुकेश अंबानींना चार दिवसांत तिसरी धमकी : मागणीची रक्कम वाढली 400 कोटी रुपये, ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले- देशाच्या सर्वोत्तम शूटर कडून मारण्याची धमकी...

रोहन दसवडकर
 
 देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना चार दिवसांत तिसरी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 27 आणि 28 ऑक्टोबरला धमक्या मिळाल्यानंतर मुकेश अंबानींना सोमवार 30 ऑक्टोबरला पुन्हा धमकी मिळाली आहे. 
    गमदेवी पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मुकेश अंबानी यांना त्यांच्या कंपनीच्या मेल आयडीवर एक ई-मेल आला. यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तत्पूर्वी, शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी याच मेलवर 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. देशाच्या सर्वोत्तम नेमबाजांकडून त्यांंना मारले जाईल, असे मेलमध्ये म्हटले होते. 
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच अकाउंटवरून आलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता ही रक्कम 200 कोटी रुपये आहे, जर ती मिळाली नाही तर डेथ वॉरंटवर स्वाक्षरी करा.' यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पहिल्या धमकीच्या ईमेलमध्ये 'तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत', असे लिहिले होते.
  27 ऑक्टोबर रोजी पहिला ईमेल प्राप्त झाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. याआधीही अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची सुरक्षा झेड श्रेणीवरून झेड+ केली होती. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करतात. हा खर्च दरमहा 40 ते 45 लाख रुपये आहे.
  


कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता


      कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता

न्याय रणभूमी प्रतिनिधी - रोहन दसवडकर

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. कोकण कला व शिक्षण विकास ही एक संस्था आहे जी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे समाजाला चांगले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करते.  ही संस्था वंचित मुलांना मदत करते आणि शिक्षण, गावाचा विकास, अनाथाश्रमांना मदत, आपत्ती निवारण मदत आणि गंभीर आजार असलेल्या मुलांसाठी वैद्यकीय मदत यांना प्रोत्साहन देते.  
    २९ ऑक्टोबर २०२३ रोजी या संस्थेची यशाची आणि इतरांच्या मदतीची यशस्वी १२ वर्षे पुर्ण झाली. भव्य दिव्य अशी सजावट या निमित्ताने करण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
     संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंदी व मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलेला व  'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री  सौ. दीपा परब - चौधरी यांनी देखील स्वतःची उपस्थिती दर्शवली. त्यांना कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर माल्वणींतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या की माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.
   याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दादर येथे आज पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, अमित कुबडे, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
काशिनाथ धुरू हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍक्टर अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.