रोहन दसवडकर
मध्य रेल्वेच्या आटगाव स्थानकांवर सिग्नल यंत्रणेत आणि वागनी स्थानकादरम्यान मालगाडीच्या जनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक बुधवारी विस्कळित झाली होती . त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी उपनगरीय लोकल सेवाचे वेळापत्रक कोलमडले होते . त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले . बुधवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास आटगाव स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता . त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती .
या घटनेची माहिती मिळाताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहचून हा बिघाड दुपारी ३. ५५ वाजता दुरुस्त केला . तसेच याच कालावधीत वांगणी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता . त्यामुळे मालगाडी जागीच उभी होती . हा बिघाड दुरुस्त करून मालगाडीला मार्गस्थ केली . मात्र , या दोन्ही घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि मेल एक्स्प्रेस खोळंबल्या होत्या . त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.