जिजाऊ ज्ञान मंदीरचे स्नेहसंमेलन उत्साहात !
(इस्लामपूर)
जिजाऊ ज्ञान मंदीर प्रि- प्रायमरी स्कूल बहे, इस्लामपूर यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला. यावेळी शिवमती सुवर्णा दिलीप पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श समाज घडविण्यासाठी चांगल्या पुरोगामी विचारांची गरज आहे असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साम्यवादी विचारवंत काॕम्रेड धनाजी गुरव यांनी प्रतिपादन केले.इतिहास अभ्यासक प्रा. सचिन गरुड म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांचे शिक्षण घेण्याचा अधिकार काढून घेतले आहेत आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र यावे लागेल.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे चंद्रशेखर क्षिरसागर, दिलीप पाटील ,कापूसखेड गावचे सरपंच निवृर्ती माळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले. दिपप्रज्वलन व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या माता-पालक तसेच आजी-आजोबा यांच्या वेशभूषा, चिञकला, संगीत खुर्ची , उखाणा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. अनुष्का चव्हाण, तनुष नलवडे, संस्कार शेळके या आदर्श विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जिजाऊ वंदना, स्वागत गीत , नृत्य , अंधश्रद्धा व विज्ञान तसेच अभंगगाथेचे महत्त्व यासारख्या विषयांवर नाटक, शिक्षण काळाची गरज तसेच पाण्याचे महत्त्व यासारख्या सामाजिक विषयांवर भाषणे, मोबाईल की पुस्तक यावर एकांकिका इत्यादी सादर केले.
यावेळी स्वागत परिचय व प्रास्तविक संस्थेचे संस्थापक उमेश शेवाळे , कार्यक्रमाचा आढावा सौ. आशा खाडे , सुञसंचलन तेजस्विनी शेवाळे व कु. संस्कार शेळके, आभार सौ. मेघा लाड यांनी केले. रोहित तोरस्कर, दत्ताञय नलवडे, अमोल चव्हाण, कापूसखेडचे सरपंच निवृत्ती माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अजित हवलदार, उपाध्यक्ष विशाल धस,रोहिणी आरबुने, प्रियंका शिंदे, पुजा थोरात, वैशाली यादव , ऋतुजा पोवार, आदि शिक्षक , विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.