BREAKING NEWS
latest
Lates लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Lates लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शाहरुख खानच्या सिनेमावर कॉपीचा आरोप; चोरले 'मनी हाइस्ट'चे सीन?

मुंबई: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा आता नुसता चित्रपट राहिला नसून एक सोहळा बनला आहे. चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून एटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत ६२० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान कलेक्शनच्या पलीकडेही या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर बोलले जात आहे. 'जवान २', याचे कथानक, संवाद याबद्दल चर्चा होते आहे. शिवाय सध्या एका चर्चेने जोर धरला आहे की सिनेमातील बरेच सीन कॉपी आहेत. प्रसिद्ध स्पॅनिश वेब सीरिज 'मनी हाइस्ट' आणि 'जवान' यांचा संबंध जोडला जातो आहे. या शोमधून शाहरुखच्या चित्रपटातील अनेक सीन्स कॉपी केल्याचा दावा केला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली. या भेटीत एकनाथ शिंदे त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या सोबत होते. याप्रसंगी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.
राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसातच पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते सहकुटुंब दिल्लीत आहेत. अमित शहा यांच्या या गाठीभेटी म्हणजे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज म्हटले आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी अजित अनंत पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… या सर्व घडामोडींमुळे सध्या राजकीय जोरदार चर्चा रंगत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होणार का, अशी चर्चाही सर्वत्र सुरू आहे.