BREAKING NEWS
latest

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमी वर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिवादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वरात्री दादर येथील चैत्यभूमीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन जयंती सोहळ्याच्या निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जमतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. तसेच आगामी ३ दिवस रात्री वांद्रे वरळी सी-लिंक वरील विद्युत रोषणाई सुरू ठेवण्याचे निर्देश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. 
तसेच यानंतर चेंबूर येथील सिद्धार्थनगर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या अशोकस्तंभाचे लोकार्पण केले. तसेच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नागसेन कांबळे तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर नेते आणि भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत