BREAKING NEWS
latest

'जन गण मन' शिक्षण संस्थेत विज्ञान दिवसानिमित्त भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारत हा शेती प्रधान देश आहे त्याच बरोबर विज्ञान प्रधान देखील आहे, म्हणूनच माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी "जय जवान, जय किसान, त्याच बरोबर जय विज्ञान" अशी घोषणा केली होती. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेत देखील 'जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर' यांचे  भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

सकाळच्या सत्रात 'जन गण मन' इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम विज्ञान प्रकल्प बनवून आणले होते तर दुपारच्या सत्रात 'जन गण मन विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यानी देखील आकर्षक व वैविद्यपूर्ण विज्ञान प्रकल्प बनवून आणले होते. जे एम एफ मंडपम् मधे जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचा स्वागत सत्कार झाल्यावर, पाहुण्यांनी शास्त्रज्ञ सी.व्ही रामन व अब्दुल कलाम यांची प्रतिमा पूजन करून प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. जन गण मन इंग्लिश स्कूल आणि विद्यामंदिरच्या सर्वच मुलांनी त्यांच्या विज्ञान पाठ्यपुस्तकांमधील तसेच वैज्ञानिक आधार घेऊन त्यांच्या अभ्यासू आणि कल्पना शक्तीने अप्रतिम प्रकल्प बनवून आणले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवला होता. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अचंबित करणारे प्रकल्प बनवून आणले होते व त्याचबरोबर त्या प्रकल्पाचा उत्कृष्ट रित्या स्पष्टीकरण देऊन प्रयोग करून देखील दाखवत होते.
विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे परीक्षक म्हणून वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रुचिता मोरे व प्रेरणा मिरगुळे यांनी परीक्षण केले व त्यातून उत्कृष्ट विज्ञान प्रकल्प जाहीर केले. 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा' मधून चांद्रयान प्रकल्प साठी प्रथम क्रमांक आरूष पांडे व निहरिका पांडे यांना देण्यात आला तर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक स्नेहा बढे (टेस्ला कॉईल  प्रकल्प) व आरुष गुप्ता यांना देण्यात आला. 'जन गण मन विद्यामंदिर' चे ध्रुव पवार (चांद्रयान) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर चारवी भगत, रेवा शिंदे, डॉली वर्मा यांच्या व्होल्कॅनो प्रकल्पाने दुसरा क्रमांक पटकावला. हर्शिल पारगी, प्रथमेश माने तसेच यशमित मोरे (ऍक्टी ग्रॅव्हिटी  प्रकल्प) यांना विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी पदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव केला. सर एपीजे अब्दुल कलामांसारखी लेखणी हातात घ्या, सी.व्ही रामन सारखे शास्त्रज्ञ व्हा, जयंत नारळीकरांसारखे विचारवंत व्हा व अशा शास्त्रज्ञांचा वसा घेऊन  तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालू ठेवा असे प्रेरणादायी वक्तव्य करून अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना प्रोत्साहन दिले व सर्वांच्या प्रकल्पांचे कौतुक करून त्यांना पाठिंबा दिला.
शास्त्र विषयाचे शिक्षक श्री. तेजस पाटील, सौ.अर्चना शिंगटे , सौ.मृणाल विरकुड व प्रिया दुबे यांनी विद्यार्थ्यांसाठी व विज्ञान प्रदर्शनासाठी अथक प्रयत्न घेऊन मुलांना उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. इतक्या लहान वयात स्वतः मुलांनी करून आणलेले विज्ञान प्रकल्प प्रदर्शन बघुन सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत