डोंबिवली - भारतातील अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. अठरा वर्षा खालील प्रत्येकाला या हक्काची अप्रूपता असते. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेअंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये दिनांक २८ आणि ३० जून रोजी विद्यार्थी परिषद मतदान पार पडले. आणि इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंत च्या सर्वच मुलांना मतदानाचा हक्क मिळाला.
सर्वच विद्यार्थ्यांना काही ना काही समस्या असतात, त्या समस्या समजून घेणारा एखादा प्रतिनिधी असावा असे वाटत असते, त्याच विचारातून विद्यार्थी समुदायातून काही विद्यार्थी निवडणुकीसाठी उभे राहतात. असेच एक पर्व म्हणजे विद्यार्थी परिषद निवडणूक आयोग. प्रत्येक वर्गातून काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आणि इतर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन प्रचार केला. एका वर्ग खोलीमध्ये गोपनीयता पाळून मतदान केंद्र उभे केले व सर्वांनी आपल्याला विश्वसनीय वाटणाऱ्या विद्यार्थी उमेदवाराला मतपेटी मध्ये आपल्या मताची चिठ्ठी टाकली. त्यावेळी पोलीसांच्या रुपात आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी ओळख पत्र बघूनच आत सोडले. वेगवेगळी वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत केले.
एकाच रांगेत व शांततेत चाललेले मतदान बघुन संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे भारावून गेले, एकीचे बळ हे निश्चितच महत्वाचे आहे, परंतु ज्या विश्वासाने तुम्ही तुमच्याच मित्रमैत्रिणीला निवडून देणार आहात त्यांनी देखील कर्तव्यामधील प्रामाणिकपणा आणि संयम राखला पाहिजे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी म्हटले. तर केवळ मतदानाचा हक्क बजावयाला मिळतो आहे म्हणून त्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची ही काळजी घ्या, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले आणि सर्व उमेदवारांना आणि मतधारकांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षकांनी देखील शालेय आणि सामाजिक जबाबदारीतून मतदान केले. दोन दिवसांनी मत मोजणी झाल्यावर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा ''पद ग्रहण समारंभ" मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. निवडून आलेल्या प्रत्येकाला संस्थापक व सचिव यांच्या हस्ते पदाधिकारी बिल्ले देण्यात आले. पद ग्रहण केल्यावर तुमची जबाबदारी आणि भूमिका काय असेल याचेही धडे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी दिले.
मुख्याध्यापिका ज्योती व्यंकटरामण आणि तेजावती कोटीयन यांनी शपथ ग्रहण प्रतिज्ञा वदवून घेतली. प्राप्त झालेल्या पदाचा योग्य वापर आणि विद्यार्थी नागरिकांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला तडा न जाता तुम्ही केलेले कार्य अतुलनीय असणार आहे हे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नमूद केले. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कलात्मक शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांनी व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रुती चौधरी व स्नेहा कलप या विद्यार्थिनीने केले व मीरा देवघरे ने सर्वांचे आभार मानले. सोबत डॉक्टर व चार्टर्ड अकाऊंटंट दिवस पण डॉ. हेरंब व डॉ. विलास लड्डे यांचा उपस्थितीत साजरा करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा