BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२१: आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून व्यास पौर्णिमा किंवा गुरू पौर्णिमा म्हणून हा दिवस संपूर्ण भारतातून साजरा केला जातो. 'जे एम एफ शिक्षण संस्था' संचलित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा' आणि विद्यामंदिर मधे देखील मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे,  सचिव डॉ.सौ प्रेरणा कोल्हे यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती व व्यास पूजन केले. स्वागत समारंभ झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका श्यामला राव यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगून छोटीशी गोष्ट देखील विध्यार्थ्यांना सांगितली.