BREAKING NEWS
latest

डोंबिवली पोलीसांनी केल्या १,३०,०००/- रुपये किमतीच्या चोरीच्या १३ सायकल हस्तगत..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत 

  डोंबिवली पोलीस ठाणे हददीतील नंदादीप रुद्रकुटी सोसायटी, जय मधु मिलन सोसायटी चिपळुणकर रोड, गणेश प्रतिभा सोसायटी आयरे रोड, विवेक सोसायटी आयरे रोड डोंबिवली पूर्व परीसरात सायकल चोरी झाल्याबाबतच्या तकारी डोंबिवली पोलीस ठाण्यात  दाखल असल्याने सदर गुन्हयातील अज्ञात चोरांचा शोध डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सानप, सपोनि भराडे, पोहवा. वाघ, भणगे, भालेराव, लोखंडे, पो.ना. कोळेकर पोअं. राठोड, ठाकुर हे करीत असताना त्यांनी नमुद गुन्हयाचे घटनास्थळाचे आजूबाजुचे सीसीटीव्ही पाहणी करून सीसीटीव्ही च्या आधारे दोन संशयीत अनोळखी आरोपी हे सायकल चोरी करुन जात असताना दिसुन आल्याने सदर आरोपी हे ज्या मार्गाने येतात त्या मार्गावर पाळत ठेवुन दिनांक ०४/०३/२०२३ रोजी पहाटे ३.३० वा सुमारास त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यास त्यांचे पालकांच्या ताब्यात देवुन, आरोपी नामे हसमितसिंग जसमेरसिंग सैनी (वय १९ वर्षे) रा. गणेशनगर तलावाजवळ, तिसाई अपार्टमेंट रुम नं १०१, दिवा पुर्व याचेकडुन एकुण १३ सायकल (हिरो स्प्रींट, डिकॅथलॉन, कॉस एक्सीड, कॉस्मीक वायझर,अॅवॉन, हरक्युलस, बिटविन वोकी) अशा कंपनीच्या एकुण  १,३०,०००/- रुपये किंमतीच्या सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.




वरील जप्त सायकलचा अभिलेख तपासला असता खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत
) डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क :- ८१ / २०२३ कलम ३७९ भादंवि
२) डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क :- ९० / २०२३ कलम ३७९ भादंवि
३) डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क:- ९१ / २०२३ कलम ३७९ भादंवि
४) डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.कः - ९२/२०२३ कलम ३७९ भादंवि

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर, पोनि तडवी, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि बळवंत भराडे, पोहवा. विशाल वाघ, भणगे, सचिन भालेराव, लोखंडे, पोना. कोळेकर, पोअं. राठोड, चालक कोती, रायते, पोअं निलेश पाटील, पोअं गिरीश शिर्के यांनी कामगीरी केली आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत