BREAKING NEWS
latest

भाजपा सहित शिंदे गटातील २३ खासदार डेंजर झोन मध्ये आल्यानेच राज्यात भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आणण्यासाठी आणि केंद्रात भाजप पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यासाठी तयारीला लागला असला तरी महाराष्ट्रातील भाजपाच्या २३ खासदारांपैकी १० एक अपक्ष भाजपा पुरस्कृत व शिंदे गटातील १५ पैकी ११ खासदार डेंजर झोन मध्ये असल्याने राज्यात भाजप पक्ष शक्तिशाली नेत्यांच्या माध्यमातून खासदार निवडून आणण्याच्या तयारीला लागला असल्यानेच राज्यात भाजपा फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज वर्तवला जात आहे.

मागील वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षाला सुरुंग लावीत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० सेना आमदारांसहित राज्यात देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली मात्र या बंडखोरांपैकी १६ आमदारांविरोधात घटनापीठाने निकाल दिला या निकालाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांनी घ्यायचा आहे त्यातच विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याने पावसाळी अधिवेशनात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ तारखेपासून मुंबईत चालू होत आहे. त्या अगोदरच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील नऊ आमदारांसहित मंत्रीपदाची शपथ घेतली व शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. मात्र शिंदे गटातील आमदार वर्षभरापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाचे मिळून १६५ आमदारांचे बहुमत विधानसभेत असतानाही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवार यांना फोडले व आणखी ४० आमदार बहुमतास जोडले यामुळे राजकारणात खरी गोची झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांची. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांपेक्षा राजकारणात जास्त पकड आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला नेमकी हीच गोष्ट माहित पडल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना आपल्या गळाला लावले. त्यातच शिंदे गटातील आमदार हे वाचाळ वीर असल्याने भाजपाचे राज्यातली जनमानसातील प्रतिमा मलिन होत चालली आहे.

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांपैकी किमान ३५ जागांवर विजय संपादन करायचा आहे. एक तर कर्नाटकातील सत्तांतरामुळे तेथील लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला फटका बसणार आहे तो भरून काढण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून अजित पवार गटाचे ग्रामीण भागात ताकद असल्याने त्यांनी राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादीला सुरुंग लावले. त्यातच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भाजपाच्या मंत्रांपेक्षा चांगली खाती देऊन त्याचा कसर लोकसभा निवडणुकीत भरून काढण्याचा मनोदय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आखला आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील कोणत्या खासदाराची काय स्थिती ते जाणून घेऊया

 १) डॉक्टर हिना गावित - नंदुरबार (भाजपा)
 २) डॉक्टर सुभाष भामरे - धुळे - (भाजपा) 
 ३) उमेश पटेल - जळगाव (भाजपा) 
 ४) रक्षा खडसे - रावेर (भाजपा)
 ५) प्रतापराव जाधव - बुलढाणा (शिवसेना शिंदे गट डेंजर झोन)
 ६) संजय धोत्रे - अकोला (भाजपा)
 ७) नवनीत राणा - अमरावती (अपक्ष डेंजर झोन) 
 ८) रामदास तडस - वर्धा (भाजपा) 
 ९) कृपाल तुमाने - रामटेक (शिवसेना शिंदे गट डेंजर झोन)
१०) नितीन गडकरी - नागपूर (भाजपा) 
११) सुनील मेहंदे - भंडारा गोंदिया (भाजपा)
१२) अशोक नेते - गडचिरोली चिमूर (भाजपा)
१३) सुरेश धानोरकर - रिक्त कॉंग्रेस (चंद्रपूर) 
१४) भावना गवळी -  यवतमाळ वाशिम (शिंदे गट डेंजर झोन)
१५) हेमंत पाटील - हिंगोली (शिंदे गट डेंजर झोन)
१६) प्रतापराव चिखलीकर - नांदेड (भाजपा) 
१७) संजय बंडू जाधव - परभणी (शिवसेना उद्धव ठाकरे गट) 
१८) रावसाहेब दानवे - जालना (भाजपा)
१९) इम्तियाज जलाल - औरंगाबाद (एम आय एम )
२०) डॉक्टर भारती पवार - दिंडोरी (भाजपा डेंजर झोन)
२१) हेमंत गोडसे - नाशिक (शिवसेना डेंजर झोन)
२२) राजेंद्र गावित - पालघर (शिंदे गट डेंजर झोन)
२३) कपिल पाटील - भिवंडी (भाजपा डेंजर झोन) 
२४) श्रीकांत एकनाथ शिंदे - कल्याण (शिंदे गट डेंजर झोन)
२५) राजन विचारे - ठाणे (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
२६) गोपाळ शेट्टी - मुंबई उत्तर (भाजप/डेंजर झोन)
२७) गजानन कीर्तिकर - मुंबई उत्तर पश्चिम (शिंदे गट डेंजर झोन)
२८) मनोज कोटक - मुंबई उत्तर पूर्व (भाजप डेंजर झोन)
२९) पुनम महाजन - मुंबई मध्य  (भाजपा डेंजर झोन)
३०) राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई (शिंदे गट डेंजर झोन)
३१) अरविंद सावंत - मुंबई दक्षिण (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 
३२) सुनील दत्तात्रय तटकरे - रायगड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट डेंजर झोन)
३३) श्रीरंग बारणे - मावळ (शिंदे गट डेंजर झोन)
३४) गिरीश बापट - पुणे (भाजपा रिक्त)
३५) सुप्रिया सुळे - बारामती (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
३६) डॉक्टर अमोल कोल्हे - शिरूर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट)
३७) डॉक्टर सुजय विखे पाटील - अहमदनगर (भाजपा) 
३८) सदाशिव लोखंडे - शिर्डी (शिंदे गट डेंजर झोन)
३९) डॉक्टर प्रीतम मुंडे खाडे - बीड (भाजपा)
४०) ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर - उस्मानाबाद (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
४१) सुधाकर शिंगारे - लातूर (भाजपा डेंजर झोन) 
४२) जय सिद्धेश्वर स्वामी - सोलापूर (भाजपा डेंजर झोन)
४३) रणजीत नाईक निंबाळकर - माढा (भाजपा)
४४) संजय काका पाटील - सांगली (भाजपा डेंजर झोन)
४५) श्रीनिवास पाटील - सातारा (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) ४६) विनायक राऊत - रत्नागिरी सिंधुदुर्ग (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 
४७) संजय मंडलिक - कोल्हापूर (शिवसेना शिंदे गट डेंजर झोन)
४८) धैर्यशील माने - हातकणंगले (शिवसेना शिंदे गट डेंजर झोन)

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी शिवसेना शिंदे गटातील ११ तर भाजपाचे १० एक अपक्ष नवनीत राणा अमरावती तसेच आत्ता अजित पवार गटाबरोबर गेलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे एवढे खासदार डेंजर झोन मध्ये आहेत त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात गेलेल्या खासदारांबाबत लोकसभा मतदारसंघात प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. तशीच परिस्थिती भाजपाच्या डेंजर झोन मध्ये असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात आहे. हे सर्व खासदार सध्या केंद्रातील भाजप नेतृत्वाला पाठिंबा देत आहेत. जर या खासदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार दिले नाही तर याचा फटका भाजपाला केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देण्यामध्ये होणार आहे. त्यासाठीच भाजपाने रणनीतीचा भाग म्हणून महाराष्ट्रात ज्या नेत्याची ताकद त्याच नेत्याला सत्तेत प्राधान्य देण्याचे धोरण ठरविल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सुरुंग लावला आहे. ज्या शिंदे गटातील खासदारांना निवडून येण्याची शाश्वती नाही अशा ठिकाणी भाजपा त्यांचे उमेदवार तयार करीत आहे. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांमध्ये जशी आमदारांमध्ये अस्वस्थता आहे तशीच अस्वस्थता शिंदे गटातील खासदारांमध्ये सध्या झाली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत