BREAKING NEWS
latest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उमेदवार निवड प्रक्रियेत अनागोंदी कारभार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत जाहिरात क्र. ०१/२०२२ अन्वये 'असि. पब्लीक प्रॉसिक्यूटर गट अ' ची लेखी परीक्षा दि. १९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली हाती. सदर परीक्षेचा कट ऑफ निकाल  लावून दि. ०३/०३/२०२३ रोजी मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली. त्यानंतर दिनांक २३/०५/२०२३ ते ०६/०७/२०२३ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या व दिनांक २१/०७/२०२३ रोजी जनरल मेरीट लिस्ट प्रसारीत करण्यात आली.

सदर जनरल मेरीट लिस्ट मध्ये असे निदर्शनास आले की,
१) आयोगाने मुलाखतीस पात्र करण्यासाठी लावलेल्या कट ऑफ पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना देखील मुलाखतीस बोलावले. त्याबाबत पात्र उमेदवाराना कोणतीही माहिती दिली नाही.
२) आयोगाने जाहिरात प्रसिध्द करताना दिलेली स्वत: ची नियमावली पाळलेली नाही. जनरल मेरीट लिस्ट प्रसारीत करताना लेखी व मुलाखती गुण एकत्रित न करता, मुलाखतीत २१ गुण न मिळवलेल्या उमेदवारांना अपात्र केले.
३) जनरल मेरीट लिस्ट प्रमाणे आयोगाने लेखी परीक्षेत २०० मार्कपैकी ६, ८, ११, १६, १८, २१ गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये ४१ टक्के पेक्षा जास्त गुण देवुन त्यांचा 'Eligible' यादीत समावेश केला आहे. परंतु लेखी परीक्षेत १००, १२०, १२१, १२४, १२६, १२७ असे गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये ४१ टक्के पेक्षा कमी गुण देवुन त्यांना 'Not Eligible' यादीत समाविष्ठ केले असल्याने सदर उमेदवारांवर हा अन्याय आहे.
४) आयोगाने लेखी परीक्षेत २०० मार्कपैकी ६, ८, ११, १६, १८, २१ गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखती करीता का बोलावले गेले ? याबाबत अद्याप स्पष्ट केलेले नाही. 
५) आयोगाने लेखी परीक्षा घेवुन देखील त्यास काहीही महत्व न देता उमेदवारांची निवड मुलाखतीत ४१ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवण्याची अट ठेवुन निवड प्रक्रिया सदोष ठरवली आहे.

नमुद अन्यायग्रस्त ६३ उमेदवारांनी एकत्रित येवुन सदर निवड प्रक्रियेस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे आव्हान दिले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत