BREAKING NEWS
latest

सभासद आरोग्य शिबिरात सेवानिवृत्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  ज्युनियर कॉलेज एम्प्लॉयीज को.ऑप. क्रेडिट सोसायटी, मुंबई यांच्यातर्फे आरोग्य शिबिर, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सदस्य, पीएचडी धारक शिक्षक, उपप्राचार्य, प्राचार्य, पर्यवेक्षक अशी नियुक्ती झालेल्या शिक्षकांचा सत्कार, तसंच  माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर गुणवत्ता प्राप्त 
विद्यार्थ्यांचा गुणगौरव असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी  गुणवान गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. सत्तरहून अधिक सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचा सन्मान या कार्यक्रमात केला गेला. पंधरा विद्यावाचस्पतींचा गौरव करुन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सभासद आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन त्यासाठी बऱ्याच प्रमाणात शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. शिक्षकांचा, पीएचडी धारक  शिक्षकांचा यथोचित सत्कार केला गेला. महाविद्यालयात नवनियुक्त  झालेले पर्यवेक्षक, उपप्राचार्य, प्राचार्य यांचाही उचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. शिवाजीराव नलावडे उपस्थित होते. त्यांनीही आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच उपस्थितीत शिक्षक वर्गाला  सहकारी बँक, सहकारी क्षेत्र व त्यातील आर्थिक तरतुदी त्याबाबतची जागरुकता याची माहिती आपल्या भाषणातून दिली. यावेळी श्री.नलावडे म्हणाले की आरोग्यासाठी सेवानिवृत्त सदस्यांनी वेळ काढला पाहिजे व योग्य आहार आणि विहाराचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रा.जगदीश भगत यांनी यापुढेही अनेक उपक्रम शिक्षकांसाठी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घेण्याचा मानस ज्युनिअर कॉलेज एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा असेल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात आरोग्य विषयक जागरुकता सभासदांमध्ये  यावी यासाठी आरोग्य आणि योग याविषयी माहिती देण्यासाठी वालिया महाविद्यालयाच्या प्रा.सीमा वाघेला यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रेडिट सोसायटीचे सचिव विशाल बाबा, हेतूकथन उपाध्यक्ष प्रा.प्रमोद जयस्वाल यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. जितेंद्र आंबेकर यांंनी केले. 

या कार्यक्रमास खजिनदार प्रा. दीपा ठाणेकर, संचालक मंडळ सदस्य प्रा.हेमलता सुदडे, प्रा. मनोज पाटील, प्रा.उमाजी जाधव, प्रा.बी एस. पाटील, प्रा.रामनाथ दौंड, आनंद भालेराव, अमरसिंग ठोके यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याप्रमाणे निवेदनाची धुरा प्रा. दीपक वाणी यांनी सांभाळली. क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी प्रभारी सेक्रेटरी अनिल मोरे, अमोल पाटील, दिग्विजय शेवाळे, किशोर, आदित्य यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. क्रेडिट सोसायटीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ जवळपास दीडशे शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत