BREAKING NEWS
latest

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस; ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश




महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह भारतातच असल्याचं समोर आलं आहे. स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला कालन (सोमवार) माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. 

मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी देखील दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.



« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत