रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतात 'डेटा सेंटर' विकसित करण्यासाठी ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल रियल्टीमध्ये गुंतवणूकीची घोषणा केली आहे.
नवीन संयुक्त उपक्रमाचे नाव ‘डिजिटल कनेक्शन: ए ब्रुकफील्ड, जिओ आणि डिजिटल रियल्टी कंपनी’ असणार आहे. रिलायन्स ब्रुकफिल्ड आणि डिजिटल रियल्टी या भारतातील कंपन्यांमधील ३३.३३ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. प्रस्तावित गुंतवणूक रुपये ३७८ कोटी आहे जी नंतर आवश्यकतेनुसार ६२२ कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. हा व्यवहार नियामक मंजुरीच्या अधीन आहे आणि अंदाजे ३ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
भारतात 'डिजिटल रियल्टी ट्रस्ट' आणि 'ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर' यांच्यातील संयुक्त उपक्रम डिजिटल सेवा कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकसित करतो. हा संयुक्त उपक्रम उच्च-गुणवत्तेची, उच्च-कनेक्टेड आणि मागणीनुसार स्केलेबल डेटा सेंटर तैनात करतो. या करारानंतर रिलायन्स या संयुक्त उपक्रमात समान भागीदार बनेल. नवीन जेव्ही चे नाव ‘डिजिटल कनेक्शन: ए ब्रुकफील्ड, जिओ आणि डिजिटल रियल्टी कंपनी’ म्हणून पुनरब्रॅंड केले जाईल.
संयुक्त उपक्रम (जेव्ही) सध्या चेन्नई आणि मुंबईच्या प्रमुख ठिकाणी 'डेटा सेंटर' विकसित करत आहे. रिलायन्सने एका निवेदनात म्हटले आहे की चेन्नईतील १०० मेगावॅट कॉम्प्लेक्समध्ये जेव्हीचे पहिले २० मेगावाट ग्रीनफिल्ड डेटा सेंटर (एमएए१०) २०२३ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संयुक्त उपक्रमाने अलीकडेच मुंबईत ४० मेगावॅट डेटा सेंटर उभारण्यासाठी २.१५ एकर जमीन संपादन करण्याची घोषणा केली.
या करारावर भाष्य करताना, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे सीईओ किरण थॉमस म्हणाले, “आम्ही डिजिटल रियल्टी आणि आमच्या विद्यमान आणि विश्वासार्ह भागीदार ब्रुकफील्डसोबत भागीदारी करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. ही भागीदारी आम्हाला आमच्या एंटरप्राइझ आणि एस एम बी ग्राहकांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांना अधिक स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी क्लाउडमधून अत्याधुनिक, प्लग-अँड-प्ले सोल्यूशन्स प्रदान करण्यात मदत करेल. डेटा सेंटर्सना पायाभूत सुविधांचा दर्जा दिल्याबद्दल आणि त्यांच्या विकासासाठी आणि ऑपरेशनसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण केल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार मानू इच्छितो जे सन २०२५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर ची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या भारताच्या दृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा