BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत भाजप आणि विश्वदीप प्रतिष्ठान च्या वतीने मोफत बेसिक कंप्युटर कोर्स चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  शैक्षणिक क्षेत्रात संगणकाचे शिक्षण घेणे आता अतिगरजेचे झाले आहे याचा विचार करून विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठांना शिक्षण मिळावे यासाठी  संगणकाचे मोफत मूलभूत शिक्षण भाजपच्या वतीने कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशील नगरसेवक विश्वदीप पवार आणि 'विश्वदीप प्रतिष्ठान' च्या वतीने  डोंबिवलीतील फडके रोड येथील  'अजोरा डिजिटल सोल्युशन्स' या अद्ययावत संगणक प्रशिक्षण संस्थेत हे शिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सोमवारी या मोफत  प्रशिक्षणाचे उद्घाटन माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक अविनाश तिवारी, अनिल तिवारी, अनूप मिश्रा, प्रशिक्षक तेजल प्रजापती उपस्थित होते. 'अजोरा डिजिटल सोल्युशन्स' या अद्ययावत संगणक प्रशिक्षण संस्थेत मूलभूत टायपिंग, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, इंटरनेट अभ्यासक्रम मोफत शिकवला जाणार आहे. यावेळी विश्वदीप पवार म्हणाले कि, येणारा काळ डिजीटल युगाचा असेल. आपले सर्वसामान्य जगणं आणि व्यवहार हे ऑनलाईन च्या माध्यमातून करावे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोबत प्रौढ, जेष्ठ नागरिक यांना संगणक शिक्षण घेणे अंत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने डोंबिवलीतील अजोरा संस्थेत मोफत संगणक शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मोफत प्रशिक्षणास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विश्वदीप पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत