BREAKING NEWS
latest

Sandeep Kasalkar: केंद्रीय पत्रकार संघटनेत राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून डॉ. अर्जुन व्यास तर समन्वयक म्हणून हेमांग सोलंकी यांची नियुक्ती

Sandeep Kasalkar

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेत डॉ. अर्जुन व्यास यांची राष्ट्रीय प्रवक्ते तर हेमांग सोलंकी यांची राष्ट्रीय समन्वयक म्हणून संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अर्जुन व्यास हे संस्कृत भाषेचे शिक्षक असून आतापर्यंत जगभरात त्यांचे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील आयपीएस अधिकारी, इंजिनियर्स, इतर सरकारी अधिकारी, शाळा कॉलेजातील विद्यार्थी, गृहिणी, वृद्ध वयस्कर यांचा समावेश असून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत संस्कृत शिकवले जाते.
तर हेमांग सोलंकी हे आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन.ए.इ.एम.डी. या इव्हेंट मॅनेजमेंट शिक्षण संस्थेत आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. दरम्यान या शिक्षण संस्थेत पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संघटनेत सामावून घेणार असल्याचे सोलंकी यांनी सांगितले आहे. सोबत संपूर्ण भारतात देखील त्यांचा पत्रकारितेशी संबंधित असलेला जनसंपर्क आहे. त्यामुळे संघटनेचे जाळे हे संपूर्ण भारतात पसरविण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेन असे सोलंकी यांनी सांगितले आहे.
दरम्यान राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून पत्रकारांच्या समस्या, त्यांची तळमळ शासन दरबारी पोहोचविण्याचे काम करणार तसेच पत्रकारांची आर्थिक बाजू कश्याप्रकारे अधिक भक्कम करता येईल या बाबत सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे सी.पी.जे.ए. वृत्तवाहिनीची लवकरच आपण सुरुवात करू की जेणेकरून संघटनेच्या संपूर्ण भारतातील पत्रकारांना सर्व भाषांमध्ये रीपोर्टिंग करता येईल असे डॉ. व्यास यांनी सांगितले आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राची पुनर्बांधणी करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे. नुकतेच सांगली, अहमदनगर व जालना येथील कार्यकारिणी पूर्ण झाली असून इतर जिल्ह्यांमधील सध्या कार्यरत असलेली कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे आणि नवीन कार्यकारिणी बनविण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कसालकर यांनी सांगितले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत