BREAKING NEWS
latest

परिसरात हात चलाखी करून फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात घटक-३ कल्याण च्या गुन्हे शाखेस यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोहवा. अनुप कामत व पोशि. विनोद चन्ने, यांना दि. ०३/०२/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार एक संशयीत आरोपी हा कल्याण व डोंबीवली परिसरात पायी चालत जाणारे लोकांना बोलण्यात गुंतवुन हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे फसवणुक करून लुबाडले असून त्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्याकरीता कल्याण पश्चिम परिसरात सोनार गल्ली येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाली होती.

त्यानुसार मा. वरिष्ठांच्या परवानगीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि. राहुल मस्के, सपोनि. संदिप चव्हाण, सपोनि. संतोष उगलमुगले, पोउपनि. संजय माळी, मपोहवा. मिनाक्षी खेडेकर पोहवा. अनुप कामत, विश्वास माने, व इतर पोलीस अमंलदार असे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हददीत सोनार गल्ली याठिकाणी अफजल बन्ना खान (वय: ४६ वर्षे) रा. मुमताज बिल्डींग रूम नं. ७२१ पिराणी पाडा, सल्लाउद्दीन चाळीजवळ, शांतीनगर भिवंडी जि. ठाणे यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टीचे खिशात प्लस्टिकच्या  पाऊचमध्ये सोन्याचे एकुण २,६३,९३८/- रु किंमतीचे  ७ तोळे ५ ग्रॅम वजनाचे दागीने सापडले.

सदर आरोपीकडे वरील दागिन्यांबाबत चौकशी केली असता आरोपीने खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली असून सदर आरोपीकडून उघडकीस आलेले गुन्हे..
१. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ६२३/२०२३ भादंवि कलम ४२०,३४
२. डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २०७/२०२३ भादंवि कलम ४२०,३४
३. विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २२९/२०२३ भादंवि कलम ४२०,३४
४. कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ६१३/२०२३ भादंवि कलम ४२०,३४ 
५. कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ६१०/२०२३ भादंवि कलम ४२०,३४
६. कोळशेवाडी पोलीस ठाणे
गुन्हा रजि.नं. ३०८/२०२३ भादवि कलम ४२०,३४
नमुद आरोपीस महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ६२३/२३ भादंवि कलम ४२०,३४ मध्ये अटक करुन दिनांक ०४/०२/२०२४ रोजी रिमांडकामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक ०६/०२/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
सदरची कामगिरी मा.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे मा.शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व मा.निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि. राहुल मस्के, सपोनि. संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, पोउपनि. संजय माळी, पोहवा. विश्वास माने, बालाजी शिंदे, दत्ताराम भोसले, पो.ना. सचिन वानखेडे, पो.हवा. किशोर पाटील, अनुप कामत, पो.शि. विनोद चन्ने,  गुरूनाथ जरग, गोरक्ष रोकडे, विजेन्द्र नवसारे, रविन्द्र लांडगे, मिथुन राठोड, पोहवा. रमाकांत पाटील, मपोहवा. मिनाक्षी खेडेकर सर्व नेमणूक गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी यशस्वीरीत्या केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत