मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रा शरीर सौष्ठव स्पर्धा रविवारी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडली. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेअंतर्गत 'शरीर सौष्ठव श्री' स्पर्धा रविवारी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडली. या स्पर्धेत ११४ शरीर सौष्ठव खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ७ दीव्यांग शरीर सौष्ठव खेळाडूंनी आपले शरीर सौष्ठव प्रदर्शन केले. त्यामुळे स्पर्धेत एक आगळेवेगळे आकर्षण निर्माण झाले होते. दिव्यांग बॉडीबिल्डरांनी उपस्थितांची आणि मान्यवरांची मने जिंकली, हे विशेष.
विविध स्पर्धेत विजयांचा धडाका लावलेल्या सागर कातुर्डेने श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ 'शरीर सौष्ठव श्री' किताबासह सलग नववे विजेतेपद नवीन वर्षाच्या जवळजवळ दिड महिन्याच्या आतच पटकावले. अर्थात त्याला टक्कर देणारा हरमीत सिंग हा सुध्दा मागे नाही त्याने या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. याच बरोबर स्पर्धेत विविध वजनी गटाच्या स्पर्धा पार पडल्या त्यांचे प्रथम तीन क्रमांकाचे निकाल खालील प्रमाणे.
५५ किलो : १. गितेश मोरे (समर्थ व्यायाम शाळा), २. अक्षय गवाणे (पॉवर फिटनेस), ३. यश महाडिक (जय भवानी);
६० किलो : १. अरुण दास (मासाहेब जिम), २. रोहन भोसले (परब फिटनेस) ३. प्रशांत घोलम (एबीएस);
६५ किलो : १. उमेश पांचाळ (परब फिटनेस), २. संकेत भरम (परब फिटनेस), ३. अनिल जैस्वाल (सोमय्या कॉलेज);
७० किलो : १. उमेश गुप्ता (यू जी फिटनेस), २. विलास घडवले (परब फिटनेस), ३. रविंद्र माने (इंडियन नेव्ही);
७५ किलो : १. संतोष भरमकर (परब फिटनेस), २. उदय देवरे (शेळके जिम), ३. गणेश उपाध्याय (बालमित्र);
८० किलो : १. सागर कतूर्डे (इन्कम टॅक्स), २. अक्षय खोत (परब फिटनेस), ३. राजेंद्र जाधव (क्रिस्त फिटनेस);
८० + किलो : १. हरमीत सिंग (परब फिटनेस), २. प्रणव खातू (यंग दत्ताराम), ३. अभिषेक माशिलकर (जे ९ फिटनेस)
दिव्यांग : १. मेहबूब शेख (फिटनेस जिम), २. योगेश मेहेर (टोटल फिटनेस), ३. सुरेश दासरी (परब फिटनेस);
मेन्स फिजीक १६५ सेंटीमीटर :
१. सचिन बोईनवाड (गोल्ड कॉइन), २. रोहन भोसले (परब फिटनेस), ३. अनिस शिंदे (डी एन फिटनेस);
मेन्स फिजीक १६५ सेंटीमीटर वरील :
१. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप), २. हितेश ठाकुर (म साहेब), ३. रोशन पाटील (पाटील फिटनेस)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा