BREAKING NEWS
latest

ऑटो रिक्षामध्ये महिलेस बसवुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलीसांकडून सहा तासात अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक २२/०३/२०२४ रोजी पहाटे ०६.०० ते ०६.३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी निर्मला जगदीश लोंगरे (वय: ५५ वर्षे), धंदा: हार-फुलं विक्री, राहणार: गुरुकृपा अपार्टमेन्ट, संत पहीला माळा, रूम नं. २, रोहीदास मंदीर जवळ, आजदे गाव, डोंबिवली पूर्व हया ए.पी.एम.सी. मार्केट, कल्याण येथे जाण्यासाठी घारडा सर्कल, डोंबिवली- पूर्व येथून एका रिक्षात बसल्या असता अनोळखी ४ आरोपींनी आपसांत संगनमत करून पुढे काही अंतरावर बी.एस.यु. बिल्डींग जवळील मैदान, न्यु गोविंदवाडी, डोंबिवली पुर्व येथे निर्जनस्थळी रिक्षा थांबवून त्यातील रिक्षा चालकाने फिर्यादी यांच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली व मागे बसलेल्या दोन मुलांनी फिर्यादी यांचे कानास दुखापत करून फिर्यादी यांचेकडील २५,०००/- रू. किंमतीचे कानातील सोन्याचे टॉप्स, १०,०००/- रू. किंमतीची, रोख रक्कम, १,०००/- रू. किंमतीचा, मोबाईल हॅण्डसेट व १००/- रू. किंमतीची पर्स असा एकूण ३६,१००/- रू. किंमतीची मालमत्ता जबरीने चोरून नेली म्हणुन अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोंबीवली पोलीस ठाण्यात गुरनं. ३६२/२०२४ भादंवि कलम. ३९७, ३९४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम. ४, २५ प्रमाणे दि. २२/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याचे आधारे पाठपुरावा व  कौशल्यपुर्ण तपास करून गुन्हा दाखल झालेनंतर सहा तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन त्यात एका आरोपीस अटक करण्यात आली असुन ०३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असुन चोरीस गेलेला माल तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा व चाकु हस्तगत करण्यात आला आहे.

अटक आरोपीचे नाव व अटक केल्याची तारीख व वेळ

अनिल अशोक खिल्लारे, (वय: २५ वर्षे), रा. राजीव गांधी नगर, शेलार चौक, कल्याण रोड, डोंबीवली पुर्व यास दिनांक २२/०३/२०२४ रोजी सायंकाळी  १९:२४ वा. अटक करण्यात आली असून त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालील प्रमाणे आहे.
१) १८,०००/- रू. किंमतीची दोन नग कानातील सोन्याची कर्णफुले ३ ग्रॅम वजनाची,

२) २,०००/- रू. किंमतीची रोख रक्कम, त्यामध्ये ५००/- रू. दराच्या ०४ चलनी नोटा, 

३) १००/- रू. किंमतीचा, एक स्टिलचे पाते असलेला चाकु,

४) १,००,०००/- रू. किंमतीची, एक 'बजाज ऑटो' कंपनीची काळया पिवळया रंगाची एमएच०५- डीक्यू-०३६७ क्रमांकाची तिनचाकी ऑटोरिक्षा
असा एकूण १,२०,१००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील ०२ विधीसंघर्षग्रस्त बालक हे चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडयाची तयारी अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत असुन त्याअनुषंगाने सखोल तपास करता त्यांच्या विरूध्द डोंबीवली पोलीस ठाणे तसेच वाशिंद पोलीस ठाण्यामध्ये एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त सचिन गुंजाळ, मा. सपोआ, डोंबीवली विभाग सुनील कुराडे, मा. वपोनि. गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. बळवंत भराडे, पोहवा. सुनिल भणगे, विशाल वाघ, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, पोना. हनुमंत कोळेकर, पोअं. शिवाजी राठोड यांनी यशस्वीपणे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत