डोंबवली: कल्याण क्राईम ब्रँच युनिट-३ च्या पो.हवा.दत्ताराम भोसले यांना दिनांक २५.०३.२०२४ रोजी सायंकाळी ०८:०५ वा. च्या दरम्यान त्यांच्या गुप्त बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील नामचीन हद्दपार केलेला गुंड गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे रा. इंदिरानगर झोपडपट्टी डोंबिवली पूर्व, हा शेलार नाका परिसरात हातात धारदार भला मोठा कोयता घेऊन दहशत माजवत फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच कल्याण क्राईम युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना कळविताच त्यांनी लगेच सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पथकातील सपोनि. संदीप चव्हाण, पोहवा. दत्ताराम भोसले, विश्वास माने, गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, दिपक महाजन यांना दिले. लागलीच मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी जाऊन डोंबिवली पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील हद्दपार इसम नामे गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे (वय: २२ वर्षे) रा. शेलार नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे, इंदिरानगर झोपडपट्टी डोंबिवली (पूर्व) हा धारदार कोयत्यासह पोलीसांना पाहून पळत असताना पोलीसांनी त्याचा पाठलाग करत थोड्याच अंतरावर झडप घालून पकडले.
तसेच सदर तडीपार गुंडास मा.पोलीस उप आयुक्त सो. परिमंडल-३, कल्याण डोंबिवली यांचे कडील हद्दपार आदेश दि. २२/११/२०२४ पासून १८ महिन्यांकरिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले असून त्याने मनाई आदेशाचा भंग केला आहे. सदर तडीपार गुंड हा डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घातक शास्त्राने वार करून दहशत माजवणे असे एकूण ४ गुन्हे दाखल असून त्याच्यावर २ वेळा प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी केलेले आहे. त्याच्या विरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा.रजि.नं. ३८३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५, व १४२, प्रमाणे कारवाई करून डोंबिवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर तडीपार गुंडास कल्याण क्राईम ब्रांच युनिट-३ पोलिसांनी त्यास पकडून कारवाई केल्याने सदर भागातील जनतेकडून पोलीसांच्या कामगिरीच कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा