BREAKING NEWS
latest

कल्याण गुन्हे शाखा-३ पोलीसांनी केले सराईत मोटार सायकल चोरस जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३०:  गुन्हे शाखा घटक-३ कडील पोकॉ. मिथुन राठोड व विजेंद्र नवसारे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डोंबिवली पोलीस स्टेशन गु.र.न. ३९२/२०२४ भादंवि ३७९ मधील चोरीस गेलेली मोटारसायकल घेवुन एक इसम ९० फिट रोड, पत्री पुला जवळ, डोंबिवली पूर्व येथे येणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हा शाखेच्या स्टाफसह जावून खात्री केली असता बातमीस अनुसरून आरोपी रमजान ईब्राहीम शेख (वय: २१ वर्षे) रा. आशिष म्हात्रे चाळ, रूम नं ९१, व्दार्ली गाव, ता. अंबरनाथ जि. ठाणे हा मोटार सायकलसह सापडला. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्याने खडकपाडा पोलीस ठाणे, वाळीव पोलीस ठाणे, कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतुन आणखीन तीन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी रमजान शेख याच्या ताब्यातुन एकुण १,१२,०००/रूपये  कींमतीच्या एकुण ०४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीस पुढील कारवाई करीता डोंबिवली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान खालीलप्रमाणे ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

१. डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ३९२/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे,

२. खडकपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २५२/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

३. वाळीव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १२८४/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

४. कोपरखैरणे पोलीस ठाणे गुना रजि.नं. २८४/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

यातील आरोपी रमजान ईब्राहिम शेख याचेवर यापुर्वी खालील प्रमाणे मोटारसायकल चोरीचे एकुण ०८ गुन्हे दाखल आहेत.

१. विष्णुनगर पोलीस ठाणे गुर.नं १४२/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

२. विष्णुनगर पोलीस ठाणे गुर.नं. ७६/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

३. विष्णुनगर पोलीस ठाणे गु.र.नं १४१/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

४. कोळशेवाडी पोलीस ठाणे गु.र.नं २७३/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

५. कोळशेवाडी पोलीस ठाणे गु.र.नं ३१७/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

६. विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३२३/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

७. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६०४/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

८. खडकपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४२५/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे


सदर प्रस्तुत यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त (शोध-१ गुन्हे) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संदिप चव्हाण, पोहवा. विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अनुप कामत, पोना. सचिन वानखेडे, पोकाँ. गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे यांनी केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत