BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत रविवारी होणार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बौद्ध धर्म परिषद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धर्म परिषदेच्या आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले आहे. रविवारी ३१ मार्च रोजी ही परिषद डोंबिवली होत असून पूर्वेकडील स.वा. जोशी हायस्कूलच्या प्रांगणात 'बुद्धम शरणं गच्छामि' या बुद्धवंनेसाठी हजारो धम्मबांधव बौद्ध धम्म परिषदेसाठी उपस्थित राहतील. तसेच समारोपाच्या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले येणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड यांनी दिली.

या पत्रकार परिषदप्रसंगी स्वागताध्यक्ष माणिकराव उघडे,  कार्याध्यक्ष अशोक प्रगारे, सचिव गुणाजी बनसोडे, उपाध्यक्ष प्रमिला सावंत, प्रसिद्ध प्रमुख किशोर मगरे, नंदा लोखंडे, मीना साळवी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

धम्म परिषदेसाठी उद्घाटक म्हणून भंते महातेरो ज्ञानज्योती आणि अभिनेते गगन मलिक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सकाळी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन समाजभूषण प्रल्हाद जाधव हे करणार आहेत. परिषदेमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक आणि वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परिषदेत परिसंवाद माध्यमातून धम्म विषयी मार्गदर्शन मिळणार असून या परिषदेत विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे .सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात एकपात्री प्रयोग होणार असून 'स्पिरिट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार' याविषयी देखील कार्यक्रम होणार आहे.

शेवटी समारोपाच्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असून पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या परिषदेला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि भगिनी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. रात्री अरविंद मोहिते प्रस्तुत धम्मपद या वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत