BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'गुरू शिष्य' परंपरा जपणारी "गुरूपौर्णिमा" भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिविली : गुरू पौर्णिमा म्हणजे आषाढ शुक्ल व्यास पौर्णिमा. गुरू वीण कोण दाखवी वाट.. अशा गुरुंचा वरदहस्त शिष्यावर असणे म्हणजे त्रिभुवनात संजीवनी मिळाल्यासारखे आहे. दिनांक १० जुलै, गुरुवार रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा, वंदे मातरम विद्यामंदिर, कनिष्ठ व पदवी महाविद्यालय तसेच नागपूर
 (दावसा) स्थित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा इथे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून मोठ्या उत्साहात गुरु पौर्णिमा साजरी केली. योगायोग असा की गुरुवार हा गुरूंचाच वार असून "गुरु पौर्णिमा" देखील याच दिवशी संपन्न झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी यांनी महर्षी वेद व्यास व सरस्वती पूजन करून  कार्यक्रमांना सुरुवात केली. इयत्ता आठवी मधील विभूती धसाडे या विद्यार्थिनीने आपल्या गायनतून गुरू वंदना सादर केली. संपूर्णतः कार्यक्रमाची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी उचलून घेतली होती. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व शिक्षकांचे शाळेच्या प्रवेशद्वारात त्यांचे पाय धुवून पाद्य पूजन केले, औक्षण करून व फुलांचा वर्षाव करत मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये वाजत गाजत सर्वांचे स्वागत केले. 
अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांना व्यासपीठावर स्थानापन्न करून स्वतः विद्यार्थांनी हस्त कलेने बनवलेले मुकुट मान्यवर आणि सर्व शिक्षकांच्या मस्तकावर परिधान केले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली "गुरु हमारे मन मंदिर मे.. गुरु हमारे प्यार" हे गुरु गीत सादर करून सर्व शिक्षकांना मानवंदना दिली. त्यानंतर नाट्य व नृत्य शिक्षक प्रमोद पगारे, अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु द्रोणाचार्य व एकलव्य हे नाटक नृत्य सादर केले. तर प्रांजल मिश्रा आणि अर्णव अंबिके या विद्यार्थ्यांनी गुरू शिष्य कथा सांगितली. शिशु विहारच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांचे पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन  फुले वाहून, ओवाळून त्यांच्या पाऊलांची पूजा केली. वंदे मातरम महाविद्यालयात सौ. खुशबू दुबे, प्रमोद गुप्ता व प्राचार्य डॉ. नाडर, उपप्राचार्या वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व विद्यार्थी काव्या कट्टी, श्लोक साळवी,  अनुज तिवारी, शिव श्याम यादव यांनी पुढाकार घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य अलपेश खोब्रागडे उपप्राचार्य चौधरी व विद्यार्थी सोबत आंचल पटवा, सोफिया, अवनीश पटवर्धन, पार्थ चोणकर यांनी भाग घेवून गुरुपौर्णिमा साजरी केली. 
जे एम एफ संस्थेचे २०२५ हे वर्ष 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. त्याच अनुषंगाने गुरू पौर्णिमा निमित्त जे एम एफ संस्थेची इमारत रांगोळ्या, फुलांनी सजवण्यात आली. शाळेतील इयत्ता नववी, दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेला हा कार्यक्रम पाहून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे भारावून गेले. व सर्वांचे मनापासून कौतुक केले.
सर्व प्रथम आपला आत्मा हा आपला गुरू आहे, गुरू हा कधीही वाईट मार्ग दाखवत नाही, म्हणून आपले मन, आपला आत्मा आपल्याला कधीही वाईट मार्गावर जाऊ देण्यास प्रतिबंध करत असतो म्हणून तो आपला गुरू आहे, आपले आई वडील हे प्रथम आपले गुरू आहेत, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक सजीव हा आपला गुरू असतो, कारण प्रत्येकाकडून काही ना काही आपण शिकतच असतो आणि त्यातूनच बोध घेत असतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले, आयुष्यामध्ये चढ उतार करत असतानाच यश अपयशाचे चटके, टक्के टोणपे खात असताना जो हात हातात घेऊन आपल्याला दिलासा देतो तो  गुरुंचा हात म्हणजे आपले गुरू होय. केवळ शिकवणे , शिकणे म्हणजे गुरू नाही तर येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव हा देखील आपला गुरु आहे, असे संस्थापकानी आपल्या भाषणात नमूद केले.
ब्रह्मांड रचिता ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती मधील स्वतः दत्त गुरु महाराजांनी चोवीस गुरु केले होते. मुंगीला देखील त्यांनी गुरु मानले, सर्व सजीवांमध्ये मुंगी हा असा जीव आहे की तो कधीही झोपत नाही, अविरतपणे आणि चिकाटीने कार्य करणे हे मुंगीचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच दत्त गुरुंनी मुंगीला आपले गुरू मानले, अशी गुरु शिष्यांची बरीच उदाहरणे देऊन सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना गोष्ट देखील सांगितली व गुरू पौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या. 
सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व फळ देऊन गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन इयत्ता दहावी मधील इव्हा शॉ व सार्थक भाईंबीड या विद्यार्थ्यांनी केले तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान दिले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत