BREAKING NEWS
latest

“मॅडम माझ्याकडे मलिक आणि दाऊदचा फोटो आहे,” सांगणाऱ्याला क्रांती रेडकरने रिप्लाय केल्याचा ‘तो’ Screenshot निघाला खोटा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मागील अनेक आठवड्यांपासून अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवल्याचा आरोप केला. त्यानंतर वेळोवेळी कधी ट्विटरवरुन तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले. समीर यांच्या बाजूने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रसारमाध्यमांसमोर बाजू मांडण्यास सुरुवात केली. क्रांती आधी मलिक यांचं नाव घेणं टाळत होती मात्र आता ती थेट नाव घेऊन टीका करु लागलीय. मलिक आणि वानखेडे वादामधून क्रांती आणि मलिक यांच्या कन्येमध्येही ट्विटरवर नुकताच वाद झाला. असं असतानाच आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत तिच्यावर निशाणा साधलाय. मात्र या स्क्रीनशॉर्टबद्दल क्रांतीने काही तासांनी खुलासा केला असून हा सर्व प्रकार कोणत्या थराला चाललाय अशा शब्दांमध्ये तिने संताप व्यक केलाय.

मागील काही आठवड्यांपासून वानखेडे कुटुंबीय वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचं सांगितलं. त्याच विषयावरील हे चॅट आहे.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत