BREAKING NEWS
latest

स्वतंत्र मराठवाडाच नाही तर मुंबई ही केंद्रशासीत करू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी पवारांनाही लक्ष्य केले आहे.

  सदावर्ते यांनी यावेळी पवार चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले "शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिप्टा नावाची एकमेव कंपनी या भागात आणली. त्या तुप्पा भागातील कष्टकरी त्यांना मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यावेळी वेगळ्या पक्षाची कामगार चळवळ होती म्हणून ती शिप्टा कंपनीही बंद पाडण्यात आली. सामान्य लोकांना आवाज नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार व कुटुंब , शंकरराव चव्हाण व कुटुंब आणि विलासराव देशमुख व कुटुंब हेच मराठवाड्याचे मारेकरी आहेत. म्हणून आम्ही खनिजाच्या सर्वंकष अभ्यासानंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झाले पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो आहोत," असंही सदावर्तेंनी नमूद केलं. यावेळी मराठवाड्याला वेगळी वागणूक दिल्याचा आरोप करत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही मला पाठिंबा दिला आहे, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

  मुंबई वेगळी का हवी ? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबाईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४×७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे. अशी भुमिका मांडलीआहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत