BREAKING NEWS
latest

चित्रपट अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील  सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याचे निधन झाले. सुनील शेंडे हे घरामध्ये चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील शेंडे यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं हृषिकेश, ओंकार आणि सुना असा परिवार आहे.

  ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये दमदार भूमिका सारकारल्या होत्या.  चित्रपट आणि मालिका या माध्यमांमध्ये काम केले होते. बॉलिवूडच्या ‘गांधी’, ‘सरफरोश’ आणि ‘वास्तव’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये सुनील शेंडे यांनी काम केले होते. या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. तसंच, त्यांनी ‘कथुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसे बाप तसे पोर’, ‘ईश्वर’, ‘नरसिंहा’ या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली छोटी भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. सुनील शेंडे यांनी डीडी दूरचित्रवाणीवरील ‘सर्कस’ मलिकेमध्ये बाबूजी (सर्कसचा मालक) ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

  गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत