कल्याण शिळ रोड रस्ता रुंदीकरण करताना कल्याण-शिळरोड वरील शंकरानगर, विलास स्मृती इमारतीच्या समोर सोनारपाडा, दिनांक १८/१२/२०२२ रोजी पहाटे ३:३३ मिनिटाने मोटारसायकलस्वार मनोज कुमार नामक व्यक्ती (राहणार डोबिवली, पलसर गाडी नंबर एमएच०५/सीडी-६९२८) याचा जागेवरच मृत्यू झाला. याच्या मृत्यूस कल्याण-शिळ रोड रूंदीकरण करण्याचे काम घेणारी 'साकेत इंफ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. गुरुनामे व साईट इंजिनिअर श्री. कमलेश चौधरी हेच जबाबदार आहेत कारण ही जमीन रस्ता बाधित शेतकरी श्री.गणेश म्हात्रे यांच्या मालकीची असून सर्व्हे.नंबर ७७/२ या जमिनी मध्ये विनापरवागी प्रवेश करुन बेकायदेशीर खोदकाम करवून माती चोरून नेली याप्रकरणी दि.१७/१२/२०२२ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता 'साकेत इंफ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. गुरुनामे व साईट इंजिनिअर श्री. कमलेश चौधरी यांची भेट घेऊन आपण केलेल्या कृत्याचा जाब विचारला असता जोपर्यंत जमीनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या मालकीची जमीनीत कुठलेही काम करु नये व आमच्या मालकीच्या जमीनीतुन माती घेऊन गेला आहात ती माती टाकून जमीन पुर्वरत करा अन्यथा रस्ता रोको अनंदोलन करण्यात येईल असे बजावत सज्जड इशारा श्री गणेश म्हात्रे यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिला होता.
त्यानंतर त्याच खोदकाम केलेल्या रस्त्यावर काही अंतर पुढे रात्रीची वेळी रस्ता बंद असल्याची कोणतीही सिग्नल यंत्रणा न लावल्यामुळे पुढे रस्ता खोदकाम माहिती होत नसल्याने मध्येच अचानक रस्त्यावर सिमेंट ब्लॉक रोडवर ठेवून त्याला रिबीन लावलेली होती त्यावर कुठलेही रेड लाईट अलर्टचा वापर नसल्याने रस्त्यावरील सिमेंट ब्लॉक अचानक समोर आल्याने हा दुदैवी अपघात झाला.
या संपूर्ण घटनेला जबाबदार ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा यामुळेच निष्पाप व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भारतीय दंड संहिता ३०४ नुसार गुन्हा दाखल करावा व जमिनीत बेकायदेशीर प्रवेश केल्याने व माती चोरून नेल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता ४४७ व ३७८ नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री गणेशजी म्हात्रे, सरचिटणीस श्री. जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष श्री. नवनीत म्हात्रे, खजिनदार श्री.महेंद्र म्हात्रे यांनी पोलीस व पालिका प्रशासनाकडे केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा