प्रतिनिधी: अवधुत सावंत
अदानी समुह आता 'एनडीटीव्ही' चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समुह आता 'एनडीटीव्ही'वर आपला ताबा मिळविण्यासाठी पुढची पावले उचलत असल्याचे प्रॉक्सी कंपन्यांच्या सल्लागारांनी सांगितले.
प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्या आरआरपीआर होल्डींग्ज कंपनीत २९.१८ टक्के समभाग असलेल्या एनडीटीव्हीवर अदानी समुहाच्या विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनी त्यांच्या संचालक मंडळ आणू शकते, आणि खुल्या ऑफरने बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांना रस दाखवला नसला तरी, अदानी समूह हा 'एनडीटीव्ही'चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे, आणि कंपनीवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे, असे प्रॉक्सी सल्लागार कंपन्यांच्या संस्थापकांनी म्हटले आहे. बुधवारी दुसऱ्या आठवड्यात खुल्या ऑफरसाठी इतर कोणत्याही गुंतवणूकदारांनी स्वारस्य न दाखविल्यामुळे अदानी समुह आता 'एनडीटीव्ही'चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समुह आता 'एनडीटीव्ही'वर आपला ताबा मिळविण्यासाठी पुढची पावले उचलत असल्याचे प्रॉक्सी कंपन्यांच्या सल्लागारांनी सांगितले.
अदानी ग्रुपची संपूर्ण मालकी असलेली 'व्हीसीपीएल' व्दारे ३७.४४ टक्क्यांपर्यंत शेअर होल्ड केल्यामुळे अदानी ग्रुप हा 'एनडीटीव्ही'चा सर्वात मोठा एकमेव शेअरधारक बनला. अदानी ग्रुपने ३७.४४ टक्के हिस्सा मिळविल्यानंतर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे आता ३२.२६ टक्के एवढा एनडीटीव्हीचा हिस्सा राहिला आहे. २२ नोव्हेंबर रोजी 'एनडीटीव्ही'च्या शेअर्सची खुली ऑफर जाहीर करण्यात आली होती, ही ऑफर ५ डिसेंबर पर्यंत असणार आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणीही गुंतवणूकदार कंपनीने शेअर्स खरेदीमध्ये स्वारस्य दाखविलेले नसल्याचे 'मुंबई स्टॉक एक्सेंज'च्या माहितीवरुन दिसून येते. याबाबत अदानी ग्रुपकडून कोणतेही स्टेंटमेंट देण्यात आलेले नाही.
सेबीचे माजी कार्यकारी संचालक आणि प्रॉक्सी अॅडव्हायझरी फर्म एसईएसचे एमडी जे.एन. गुप्ता म्हणाले, “अदानी समूहाच्या स्टेकमुळे 'एनडीटीव्ही'च्या संचालक बोर्डात अदानी ग्रुपच्या संचालकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीचे शेअर बुधवारी ४४६.३० च्या सर्किटवर खुला झाला. त्या किंमतीवर शेअरबाजाराच्या सत्रादरम्यान राहीला. यातील प्रत्येक शेअरवर २९४ रुपयांच्या सवलतीची ऑफर असून ती शेअर बाजाराच्या ३४ टक्के सवलतीची आहे. ही सवलत ऑफर सलग चौथ्या सेशनमध्ये ५ टक्क्यांच्या सर्कीटवर पोहचली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा