BREAKING NEWS
latest

एकनाथ शिंदेची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाणार ? बावनकुळेंचे सुचक विधान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेनं चालल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यावर आता बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  वाबनकुळेंच्या त्या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून आता त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याबाबत बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे. एवढचं बोलून ते थांबलेले नाहीत तर यापुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आली आहे. असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच सध्याचे सरकार हे फेब्रुवारीपर्यतच असल्याचे सुचक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच आता बावनकुळे यांनी फडणवीस यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

  संत जगनाडे महाराज यांच्यावर आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना बावनकुळे म्हणाले, आता सर्व जातीच्या लोकांनी फडणवीसांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. येणाऱ्या आगामी निवडणूकांमध्ये पुन्हा कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित नागरिकांना विचारला होता. त्यावेळी लोकांकडून फडणवीस असे उत्तर आल्यानंतर बावनकुळेंनी आता आपण त्यांच्यापाठीमागे उभी राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत