BREAKING NEWS
latest

तलवारीने हल्ला चढवत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण पेटले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची काल रणधुमाळी थांबली आहे. प्रचार संपताच अंतर्गत गटबाजी समोर आलेली  पाहायला मिळाली आहे. बीडच्या दगडी शाहजानपूर इथे  ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे.  काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय.

  पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याअगोदरच पोलिसांनी भाच्याला पकडले. त्यामूळे मोठी दुर्घटना टळली. प्राप्त माहितीनुसार, शिवाजीराव चव्हाण असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तलवारबाजी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

  मामा चव्हाण आणि भाचा जाधव या दोघांची भेट बीड येथील राजीव गांधी उद्यानासमोर झाली. शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला तेवढ्यात जवळच चौकात उभे असलेल्या दोन पोलीस हवालदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानी तलवार जप्त केल्याने अनर्थ टळला. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत