BREAKING NEWS
latest

सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर इथे सुरू झाले, वंदे मातरम् ने दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले त्याला आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुरुवातीलाच केली. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांना बंदी कशी घातली , त्यांना कोणता अधिकार असा सवाल करीत पवार यांनी ही दडपशाही खपवून घेऊ नये, अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंद घेत त्यांना खाली बसण्यास सांगितले त्यावर विरोधक आक्रमक झाले होते.

  देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्या मागणीवर एक बैठक घेतली हे पहिल्यांदाच घडले, आम्ही ठोस भूमिका घेतली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. क्रियेला प्रतिक्रिया होईल याची समज आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिली , गृहमंत्र्यांनीही त्यांना योग्य समज दिली आहे, माध्यमांसमोर गृहमंत्री अमित शहा यांनी हे स्पष्ट केलं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. या विषयावर राजकारण करू नये, हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

  आम्ही जत तालुक्यातील ४८ गावांसाठी दोन हजार कोटींची योजना मंजूर केली आहे. सीमा वादावर आम्ही कारावास भोगला तेव्हा बोलणारे कुठे होते असा सवाल त्यांनी केला, सीमावसियांच्या योजना ठाकरे सरकारने बंद केल्या होत्या, त्या आम्ही पुन्हा सुरू केल्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत