BREAKING NEWS
latest

जोगेश्वरीत बनावटी पत्रकारांची बंटी बबलीची जोडी; मनसेच्या पदाधिकाऱ्यांची केली लाखोंची फसवणूक

विशेष प्रतिनिधी
जोगेश्वरी पूर्वेत राहणारी एक २२ वर्षांची तरुणी व एक २६ वर्षांचा तरुण स्वतःला पत्रकार असे म्हणून मनसेच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून लाखो रुपये घेऊन लंपास झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
या बंटी बबलीच्या जोडीसोबत मराठवाडा तसेच कोकणात राहणारे काही बनावटी पत्रकार देखील सामील असल्याचे उघडकीस झाले आहे.
ही बनावटी पत्रकार तरुणी जोगेश्वरी पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात राहते तर दुसरा बनावटी पत्रकार कोकण नगर परिसरात राहत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दरम्यान या बनावटी जोडीला शोधण्याचे काम सध्या मनसेचे काही कार्यकर्ते करत असून लवकरच त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असे मनसेच्या एका कार्यकर्त्याने न्याय रणभूमी वर्तमानपत्राच्या संपादकांना फोनद्वारे सांगितले आहे.
अश्या बनावटी पत्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याचे विनंती पत्र देखील न्याय रणभूमी तर्फे स्थानीय पोलिस स्टेशनला देणार असल्याचे संदिप कसालकर यांनी म्हटले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत