BREAKING NEWS
latest

उल्हासनगर पोलिसांकडून चार पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  उल्हासनगरमधील प्लास्टिक उत्पादन बनवण्याचा कारखाना बंद करण्याची धमकी देत चार पत्रकारांनी चाळीस हजार रुपये खंडणी घेतली. याबद्दल त्यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार असून, पुढील तपास सुरू आहे.

  सविस्तर वृत्त असे की उल्हासनगरमधील एका प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या  कारखानदाराला तक्रार करण्याची धमकी देत, कारखाना बंद करण्याच्या नावाने कारखानदाराकडून चाळीस हजार रुपये खंडणी घेणाऱ्या चार पत्रकाराविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खंडणीखोर कारखान्याच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शिवकुमार मिश्रा, राजेश शर्मा, रेखा दिघे, नितेश खेटवानी असे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांची नावं आहे. 

१ लाख रुपयांची मागणी, ४ पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
  उल्हासनगरमधील सतिष चाळ कंपाऊंड परिसरात मामल पॉलीमर्स एल.एल.पी नावाने जोसेफ जॉन डिसूजा यांचा प्लास्टिकचा कारखाना आहे. या कारखान्याची प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी मॅनेजर उदय खिल्लीरी यांना खंडणीखोर पत्रकारांनी दिली. त्यानंतर १४ नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर रोजी या आरोपींनी कारखाना बंद करण्याची धमकी देत, १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून ३० हजार रोख आणि १० हजार 'गुगल पे' वर  ऑनलाईन असे एकूण ४० हजारांची खंडणी घेतल्याची तक्रार कारखान्याचे मालक जोसेफ जॉन डिसूजा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिली.

अनोखळी खंडणीखोर      
  कारखान्याचे मालक डिसूजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी चार पत्रकारांसह इतर अनोखळी खंडणीखोर विरोधात भादंवि कलम ३८५, ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच चारही आरोपी फरार असून हे आरोपी विविध साप्ताहिक आणि युट्युब चॅनेलचे पत्रकार असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत