BREAKING NEWS
latest

ग्रामस्थ मंडळी राव समाज याची वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न

विशेष प्रतिनिधी
रायगड: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत विसावलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौऱ्याची गाथा असलेल्या पोलादपूर तालुक्यातील एका छोट्याशा पण प्रसिद्ध कोतवाल गावचे माजी सरपंच, तालुक्याचे पहिले सभापती कै. बंधुजीराव पालांडे आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पाहिलेच आमदार विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद गटनेते प्रविण यशवंत दरेकर व माजी नगरसेवक, मुंबई हौसिंग फेडरेशन अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या मुळे नावलौकिक झालेले गाव कोतवाल बु॥ या गावामध्ये बहुजन समाज प्राचीन काळापासून एकोप्याने व गुण्यागोविंदाने नांदत असून संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या कोतवाल गावी ग्रामस्थ राव मराठा समाजाची सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाच्या पुजेनिमित्त ग्रामदैवत कालकाई मातेचा अभिषेक व होम हवन सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने मोठ्या हर्षउल्हासाने व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम कालकाई मातेच्या मुर्ती मिरवणूक सकाळी नऊ वाजता गावकऱ्यांनी लेझिमच्या तालावर नाचत वाजत गाजत गावदेवी मंदिरात नेवून विधिवत पद्धतीने अभिषेक व होमहवन करण्यात आले. सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली.
सोबत मुबई पुणे येथील राहणाऱ्या महिलांनी गावातील सर्व महिलांसाठी हळदीकुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यानंतर ह.भ.प. माजी सुभेदार परशुराम दरेकर व ग्रामस्थ यांचा सुश्राव्य हरिपाठ मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. त्यानंतर त्यांचेच चिरंजीव रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित गावात लहानाचे मोठे होऊन प्राथमिक शिक्षक म्हणून नवीन पिढीला योग्य ते मार्गदर्शन करणारे उच्च शिक्षा विद्याभूषित, सर्वांचे लाडके, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व ह.भ.प. सचिन महाराज परशुराम दरेकर यांचं मंत्रमुग्ध करणारे सुश्राव्य हरिकिर्तन अतिशय सुंदर व प्रभावी प्रबोधन ठरले. प्रसंगी त्यांचा सत्कार गावचे सुपुत्र सैनिक फेडरेशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष निवृत्त सुभेदार सुभाष दरेकर यांच्या वतीने, जन्मदाते आई-वडील व पत्नी तसेच मुलांच्या समवेत गावातील ज्येष्ठांच्या व सर्वांच्या साक्षीने "याची देही याचि डोळा" असा हा सोहळ्याचे औचित्य साधुन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ल रखुमाईची प्रतिकृती देवून गौरविण्यात आले त्यानंतर गावातील नवनिर्वाचित सरपंच रेखा अनंत दळवी (दरेकर) उपसरपंच राजेश कदम व सर्व सदस्यांना सन्मानीत करण्यात आले त्यानंतर गावच्या ज्येष्ठांचा, प्रतिष्ठित व्यक्तींचा व पंचक्रोशीतील आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व शेवटी अन्नप्रसादानंतर हा आनंदी सोहळा यशस्वीपणे पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य पूर्ण दिवसभरासाठी भोजन व्यवस्था व फुलांची सजावट प्रवीण दरेकर यांच्या पत्नी नीता प्रविण दरेकर यांनी करून संपूर्ण कार्यक्रमात त्यांचे सोबत त्यांचे चिरंजीव कु. यश हे ही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली .तसेच भाविकांना मुंबईवरून ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था सुभाष दरेकर यांनी केली, वाजंत्री व्यवस्था कृष्णकांत दरेकर, मिष्टान्न माजी सरपंच महेश दरेकर, कीर्तनकारांना वस्त्र विजय दत्ताराम दरेकर, तीर्थ व प्रसाद प्रकाश दरेकर व संपूर्ण स्वादिष्ट व रुचकर जेवण बनविण्यासाठी सहकार्य लाभले ते समाजसेवक माजी सैनिक कृष्णदास अण्णा दरेकर याचे व सहकार्यांचे व सर्व ग्रामस्थांच्या यथाशक्ती देणगीदारांच्या सहकार्याने पार पडला, कार्यक्रम आयोजनाचे सर्व श्रेय ग्रामस्थ मंडळी व आयोजन कमिटीला जाते त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकाऱ्यांचे आभार व उपस्थितांच्या अभिनंदनाने कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले..बहुजन समाजातील अनेक मान्यवरांनी या वेळी भेट देऊन सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.. सुत्रसंचलन विजय दरेकर यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत