BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील 'होली एंजल्स' शाळेचे राष्ट्र उभारणीसाठी योगदान महत्त्वाचे - कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  शालेय शिक्षण घेण्याच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारे संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील 'होली एंजल्स' शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणीसाठी संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले.

  डोंबिवलीतील गांधी नगर पीएनटी मधील 'होली एंजल्स' शाळेच्या दोन दिवसीय ३३ वा वार्षिकोत्सव नुकताच पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार रवींद्र चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर उपस्थित होली एंजल्स शाळेचे संस्थापक डॉ.ओमेन डेव्हिड, मॅनेजिंग ट्रस्टी लीला ओमेन, प्राध्यापक बीजाॅय ओमेन, रोटरीयन जिल्हा गव्हर्नर कैलास जेठाणी, मुख्याध्यापिका रफट शेख अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
 यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांचे पालक, होली एंजल्स शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन यांच्या अथक प्रयत्नांमुळे कुमारी दिक्षा सुवर्णा या विद्यार्थीनीने यंदा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण प्राप्त करुन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक आणि खेळात देखील आंतरराज्यीय स्तरावर अग्रेसर आहेत. शालेय शिक्षणाच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील 'होली एंजल्स' शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणी साठी उत्तम संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले. डॉ.ओमेन डेव्हीड व लिला ओमेन यांना शैक्षणिक क्षेत्रातील दिर्घ अनुभव असल्याने राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी घडत असल्याचे नामदार चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. वार्षिकोत्सवात कुमारी दिक्षा सुवर्णा हिचा सत्कार नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक आणि खेळात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मॅनेजिंग ट्रस्टी लिला ओमेन आणि संस्थापक ओमेन डेव्हिड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या दोन दिवसीय ३३ व्या वार्षिक उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या विविध कला सादर केल्या. या वार्षिक उत्सवासाठी सलग दोन दिवस पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात उपस्थित होता.
 या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती याच शाळेची माजी विद्यार्थिनी जिने २००९ साली दहावीच्या महाराष्ट्र राज्य बोर्डात ९१.६९ % गुण पटकावून शाळेत तिसरी आलेली कुमारी अदिती अवधुत सावंत हिने जगातील ९ व्या मानांकित अमेरिकेतील एम्स शहरातील 'आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी' तून  'मास्टर्स इन ऍरोस्पेस ऍण्ड ऍरोनॉटीकल इंजिनियरिंग ची पदवी घेऊन नोकरी करत असून भारतात सध्या अमेरिकेतून सुट्टीवर आलेली आहे. 
  अदिती सावंत या माजी विध्यार्थीनेने खास करून ३३व्या वार्षिकोत्सवास उपस्थित राहून नामदार रवींद्र चव्हाण व 'होली एंजल्स' शाळेचे संस्थापक ओमेन डेव्हिड, लीला ओमेन, प्राध्यापक बिजॉय ओमेन,  ऍनी बिजॉय, मुख्याध्यापिका रफट शेख, माजी शिक्षिका अनिता सोनावने, नेहा कामत, वीजी श्रीनिवासन, जयंती अखिलेश्वरन, रेवती टीचर यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या समस्त विध्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत