BREAKING NEWS
latest

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  उल्हासनगर वाहतूक उपविभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय रघुनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकल तसेच वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार व त्यांच्यासोबत असलेले वॉर्डन यांच्या कडून शहाड रेल्वे स्टेशन, शहाड जकात नाका, म्हारळ जकात नाका, शांतीनगर, उल्हास नगर रेल्वे स्थानक, सतरा सेक्शन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दंडात्मक कारवाईतून एकूण ९९२ चलन आकारणी करण्यात आली असून सरकारी तिजोरीत ९,९१,०५० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत