BREAKING NEWS
latest

४० कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधीच त्यांच्यावर साखर कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी 'ईडी'कडून चौकशी सुरु असताना आता त्यांच्यावर साखर कारखान्यातच ४० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक होण्याची शक्यता 

हसन मुश्रीफ यांनी कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी 'ईडी'कडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र, यापुढे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. परंतु, आता हसन मुश्रीफ यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या आधारे 'ईडी' हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई करणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

  पोलीसांच्या तक्रारीत हसन मुश्रीफ यांनी सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा करुन ते वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आणि संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या काही सभासदांनी याविरोधात शनिवारी मुरगुड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत