इंटरनेट बॅंकीगचा युगात वापर जेवढा सोपा तेवढाच त्याच्या वापराबाबत योग्य सावधगिरी न बाळगल्यास लुटले जाण्याच्या खूप घटनाही समोर येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते. नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडप्याला तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.
नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडपे त्यांच्या डिश वॉशरसाठी कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधत होते. तिथे त्यांना एक नंबर सापडला जो आयएफबी कस्टमर केअरच्या नावाने नोंदणीकृत होता. सध्या हा नंबर बंधन बँकेचा कस्टमर केअर नंबर म्हणून नोंदणीकृत आहे. या नंबरवर कॉल केला असता एका महिलेने फोन उचलला व तिने आपल्या वरिष्ठांकडे फोन दिला.
वरिष्ठ महिलेने फोन करणाऱ्या वृद्ध महिलेला 'एनीडेस्क' हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यात आपली माहिती भरण्यास व १० रुपये भरून तक्रार दाखल करण्यास सांगितले. या दरम्यान अनेकदा त्यांचा फोन कट झाला व समोरील महिलेने तिच्या वैयक्तिक नंबरवरून कॉल केला. त्याच दिवशी संध्याकाळी ४.१५ वाजता जोडप्याच्या बँक खात्यातून २.२५ लाख रुपये काढले गेले. दुसऱ्या दिवशी ५.९९ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला. जोडप्याने पोलीसांकडे तक्रार केली, आपले बँक खातेही गोठवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा