BREAKING NEWS
latest

भारताची जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  नवी दिल्ली येथे झालेल्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. निखार झरीनने ४८-५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. निखारने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत तिचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.

निखारच्या आधी नीतू गंगस (४५-४८ किलो) आणि स्वीटी बोरा (७५-८१ किलो) यांनी शनिवारी वजन गटात सुवर्णपदक जिंकले होते. निखार जरीनचे हे 'वर्ल्ड चॅम्पियनशिप' मधील दुसरे सुवर्णपदक आहे. तिने गेल्या वर्षी ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

पहिल्या फेरीत निखारचे पूर्ण वर्चस्व होते. तिने विरोधी बॉक्सरला एकही संधी दिली नाही. पहिल्या फेरीतच तिने ५-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या व्हिएतनामच्या बॉक्सरने दमदार पुनरागमन केले. पण, निखारने संधी मिळताच विरोधी बॉक्सरवरही ठोशांचा वर्षाव केला. मात्र, दुसरी फेरी व्हिएतनामच्या बॉक्सरने ३-२ अशी जिंकली.

तिसरी फेरीही चुरशीची झाली. निखार आणि व्हिएतनामच्या बॉक्सरने आपली पूर्ण ताकद दाखवली. प्रशिक्षकाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करत निखारने विरोधी बॉक्सरपासून अंतर राखले आणि उत्कृष्ट अप्परकट आणि जॅब्स पंचेस लावले. यानंतर रेफ्रींनी सामना थांबवून व्हिएतनामी बॉक्सरची स्थिती जाणून घेतली. इथूनच निखारचा विजय जवळपास निश्चित झाला होता आणि अखेरीस निखारने ही लढत ५-० अशी जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक जिंकले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत