प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली पश्चिम मंडळाचे सरचिटणीस समीर चिटणीस यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, माजी अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी अध्यक्ष संजीव बिडवाडकर, युवा आघाडी अध्यक्ष मितेश पेणकर, महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, चिटणीस बंधू, त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी, डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक, रिक्षा चालक आणि इतर मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी रोड वर असलेल्या अंबिकानगर येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भावे सभागृह येथे समीर चिटणीस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच लोकउपयोगी कामे, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. पारदर्शी व्यावसायासोबत सामाजिक कार्यात चिटणीस बंधूंचा डोंबिवलीमध्ये सहभाग असून, समीर चिटणीस यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोकण तसेच कोरोनाच्या काळामध्ये कोकणात आणि डोंबिवली मध्ये नागरिकांना सहाय्यभूत ठरेल असे कार्य त्यांचे सहकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू केले होते. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये समीर चिटणीस हे अभ्यासू लोकप्रिय व्यक्तिमत्व असून, सर्वपक्षीय मित्रमंडळी त्यांचे स्नेही आहेत. समीर चिटणीस हे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मर्जीतील असून डोंबिवली पश्चिम येथील भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे भाजपमधील त्यांचे सहकारी पाहत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सामाजिक कार्याचा व्याप आणि कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने आकाराने मोठे कार्यालय घ्यावे लागल्याची चर्चा उद्घाटन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा