BREAKING NEWS
latest

भारतीय जनता पार्टीच्या ४३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय जनता पार्टीच्या ४३व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्ह्यामध्ये प्रचंड आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यालयामध्ये आज सकाळीच पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून ध्वजारोहण केले त्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्रजी पवार, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले व जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांचा त्यावेळी सत्कार करण्यात आला. जुन्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आज पक्षात काम केल्याचा अभिमान वाटल्याचं त्यांनी सांगितले माजी जिल्हाध्यक्ष के.आर. जाधव माजी, जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, माजी नगरसेवक रमाकांत उपाध्ये, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सिताराम कदम, निरजा मिश्रा, कपिल देव शर्मा, राजेंद्र बेहेनवाल, इंदुमती सूर्यवंशी, चंद्रशेखर तांबडे, सुधा जोशी  हेमल रवानी असा अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, शशिकांत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यालयामध्ये पेढे वाटून व फटाके उडवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत