BREAKING NEWS
latest

गुन्हे शाखा घटक - ३ कल्याण कडून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ०२ तासात केले जेरबंद..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिळकनगर पोलीस स्टेशन गुना रजि. नं. ९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२ या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे रमेश वेलचामी (तेवर) हा गुन्हा केल्यानंतर धारावी मुंबई तसेच मुळगावी तामिळनाडु राज्यात पळून जाणार असल्याची शक्यता गृहित धरुन त्यानुसार नमुद पाहिजे आरोपीचे छायाचित्र प्राप्त करून घटकातील अधिकारी/अमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य सुचना देवुन एक पथक धारावी मुंबई, तसेच दोन पथक कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म परिसरात आरोपीचे शोधार्थ घेण्याकरीता रवाना केले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोहवा  प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव, पोलीस शिपाई गुरुनाथ जरग या पथकाने प्राप्त छायाचित्र, मोबाईल नंबर तसेच तात्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद संशयीत नामे रमेश व्ही. (रमेश वेलचामी तेवर) वय २८ वर्षे रा. शिवाजी शेलार यांचे घराचे शेजारी, कांचनगाव, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व, कल्याण यास कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र ०६ चे मुंबई दिशेकडील ब्रिज जवळून पथकातील पोहवा प्रशांत वानखेडे यांनी ताब्यात घेवुन त्याकडे विचारणा करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याच्यावर  संशय बळावला त्यामुळे त्याची अंगझडती घेता रेल्वे गाडी क्र. २२१५७ चैन्नई एग्मोर या जलद गाडीवे ई-तिकीट पीएनआर क्र. ८७०२८५७२९५ हे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, मानपाडा येथील कार्यालयात आणुन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा मेव्हणा मारीकन्नी रामास्वामी (तेवर) रा. शिवाजी शेलार यांच्या घराचे शेजारी. कांचनगाव, खंबाळपाडा, डोंबिवली, कल्याण यास रागाचे भरात चाकुने भोसकुन / हल्ला करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असुन रात्री चैन्नई एग्मोर रेल्वेने मुळगावी पळून जाणार असल्याची कबूली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवाली करण्यात आले आहे.


सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. जयजित सिंग, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे (गुन्हे शोध १) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक शशांक शेळके व त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहा पो उपनिरी संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव पोहवा विकास माळी (मानपाडा पोलीस ठाणे), रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापुराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, पोहवा  गोरखनाथ पोटे, विलास कडू, पोशि गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, चापोशि राहुल ईशी सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यानी यशस्वीरीत्या केलेली आहे.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत