BREAKING NEWS
latest

अर्चना मोहिते या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनात्मक वाद्यवृंदाचं निवेदन करणारी पहिली महिला निवेदिका ..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  'धम्मपद एक धम्मदेसना' हा अरविंद मोहिते प्रस्तुत महापुरुषांच्या व राष्ट्रमातांच्या जीवनावर आधारित वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महर्षी  महात्मा जोतिबा फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गाणी, नृत्य , नाट्य सादर केले जाते आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे निवेदन (प्रबोधन) हे अर्चना मोहिते करतात. अशा प्रकारचे कार्यक्रम करणारे बरेचसे ग्रुप आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे निवेदन (प्रबोधन) करणारी सगळ्यात पहिली व आतापर्यंत कोणीही न ऐकलेली व पाहिलेली पहिली महिला निवेदिका ह्या अर्चना मोहिते आहेत. ह्यांचं निवेदन (प्रबोधन) हे कणखर, तडफदार, लोकांना विचार करायला लावणारं व परिवर्तन घडवून आणणारं आहे. २०१२ मध्ये अर्चना मोहिते यांनी हे प्रबोधन करायला सुरुवात केली व आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ५०० पेक्षा अधिक कार्यक्रम त्यांनी निवेदिका म्हणून केलेले आहेत.


अर्चना मोहिते यांचं असं म्हणणं आहे की, ह्या महापुरुषांनी व राष्ट्रमातांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असेल स्त्री किंवा पुरुष असेल प्रत्येकासाठी संघर्ष केलेला आहे प्रत्येकाला हक्क अधिकार मिळवून दिलेला आहे मग फक्त एक विशिष्ट समाजालाच याची जाणीव का ? प्रत्येकाला याची जाणीव का नाही ? आणि म्हणूनच प्रत्येकाला या महापुरुषांचे व राष्ट्रमातांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष व आपल्याला मिळवून दिलेले न्यायिक हक्क अधिकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचं काम अर्चना मोहिते करत आहेत.

अर्चना मोहिते यांचं असंही म्हणणं आहे की ह्या महापुरुषांनी व राष्ट्रमातांनी आपल्याला न्याय मिळवून दिलेला आहे तर ह्या महापुरुषांनाही न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला त्यांच्या कार्याची जाणीव असली पाहिजे. म्हणूनच तळमळीने अर्चना मोहिते हे प्रबोधनाचं काम 'धम्मपद एक धमदेसना' या वाद्यवृंदाच्या माध्यमातून करत आहेत व शेवटच्या श्वासापर्यंत करत राहण्याचा त्यांचा मानस आहे असे त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.

महापुरुषांचे व राष्ट्रमातांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या पहिल्या महिला निवेदिका अर्चना मोहिते यांच्या कार्याला जाहीर सलाम व समाजप्रबोधनाचे काम अखंड करत राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.


 

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत