BREAKING NEWS
latest

अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या खरेदी विक्री नशेच्या बाजारासाठी लपून छपून होत असल्याच्या बातम्या दर दिवशी ऐकायला मिळत होत्या. अशातच नशा करून नवीन पिढी नशेत वाहून खराब होत असताना, नशेच्या वस्तू विकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळणे, त्यांच्यावर अंकुश ठेवणे अतीशय गरजेचे आणि चॅलेंजिंग काम झाले होते. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, यांनी सदर जबाबदारी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफ यांच्यावर सोपवली होती.

दिनांक ०९.०५.२०२३ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिराग हॉटेलच्या जवळ, रेतीबंदर कडे जाणाऱ्या पूला खाली दोघेजण 'गांजा' या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची बातमी डिटेक्शन स्टाफ मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली. सदरची माहिती ताबडतोब वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'चिराग हॉटेल'च्या बाजूच्या गल्लीत, कल्याण येथे डिटेक्शन इन्चार्ज सपोनि अरुण घोलप यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, पोलीस नाईक रामदास फड यांनी सापळा रचला.


बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार दोन इसम त्यांच्याकडील ऍविएटर मोटरसायकलने येत असताना दिसताच, त्यांना पळून जाण्यास वाव न देता डिटेक्शन पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या गाडीची व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीत सहा किलो गांजा असा अंमली पदार्थ मिळून आला असून त्यांची नावे करीम उर्फ बाबू शब्बीर शेख (वय ३९ वर्षे) राहणार अहिल्याबाई चौक, पटेल वाडी, कल्याण (पश्चिम),  सीमाब कईम शेख उर्फ गुड्डू चपाती (वय ३४ वर्षे) राहणार - मौलवी कंपाउंड जाहीर मोलवीची चाळ, रेतीबंदर कल्याण (पश्चिम). अशी असून त्यांच्याकडून एकूण सहा किलो गांजा हा अमली पदार्थ एक ऍविएटर मोटार गाडी, दोन मोबाईल फोन असा एकूण १,८०,०००/- रुपये कींमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गांजा हा अमली पदार्थ कोठून आणला व कोणाला देणार होते याचा पोलीस पुढील तपास करीत आहे.

सदरची कामगिरी वपोनि नरेंद्र पाटील, सपोनि अरुण घोलप, रूपवते, पोहवा सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, पोना फड, दमयंती शेळके असे असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अरुण घोलप करीत आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत