BREAKING NEWS
latest

केंद्र सरकारचा टोमॅटोचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
सध्या देशात आवक घटून टोमॅटोंच्या प्रचंड वाढत्या दरामुळे गेल्या काही दिवसात देशभर सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. मॅकडोनाल्ड सारख्या बड्या कंपनीनेही आपल्या खाद्यपदार्थांतून टोमॅटो हदद्पार करत हात टेकले आहेत. तिथे सर्वसामान्य माणसांनी करावं तरी काय अशी स्थिती झाली आहे. यानंतर आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मोदी सरकारने शेतमाल खरेदी संस्था अर्थात नाफेड आणि सहकारी संघांना आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर स्वस्त दराने टोमॅटो वितरीत करण्यात येणार आहे. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून किरकोळ बाजारात टोमॅटो २०० रुपये किलो पर्यंत दराने विक्री केली जात आहे.

राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ अर्थात 'नाफेड' आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ टोमॅटोची खऱेदी कऱणार आहेत. केंद्रीय मंत्रालयानुसार जिथे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेत, तिथे स्वस्त किंमतीत विक्री केले जातील. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात लवकरच टोमॅटोचे दर कमी होतील. वास्तविक ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. शिवाय जुलै महिन्यात मॉन्सूनमुळे भाजीपाल्याची वाहतूक करण्यात अडचणी येतात. त्यामुळे देखील दरवाढ होते. भारतात टोमॅटोचे उत्पादन कमी अधिक प्रमाणात सर्वच भागांमध्ये होते. मात्र दक्षिण आणि पश्चिमेकडे टोमॅटो पिकाचे अधिक उत्पादन घेण्यात येत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत