BREAKING NEWS
latest

मंत्रिमंडळ विस्तारात अजित दादांना अखेर वित्त खाते..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
राज्यात चाललेल्या सध्याच्या राजकीय घडामोडीत काल रात्री केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर आज शिंदे गटाने नरमाईची भूमिका स्वीकारल्याने अजित पवार यांच्या कडे वित्त खाते देण्याचे निश्चित झाले असून मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तारही आज होणे अपेक्षित आहे.

दोन तारखेला शपथविधी झाल्यानंतर तब्बल बारा दिवस राष्ट्रवादीचे मंत्री बिनखात्याचे राहिले आहेत, अजित पवार यांच्या कडे वित्त खाते देण्याचे भाजपचे धोरण आधीपासूनच निश्चित होते, मात्र शिंदे गटाचा मोठा विरोध त्याला झाला होता , अजित पवार निधी वाटपात अन्याय करतात असा आरोप करीत हा गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला होता, आणि आता पुन्हा तेच खाते त्यांच्याच कडे गेल्यावर काय बोलायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.

मात्र हा तिढा सुटत नसल्याने अजित पवार यांना थेट दिल्ली गाठावी लागली, अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यावर तिथून थेट मुख्यमंत्र्यांना संपर्क साधला गेला आणि हे खाते अजित पवार यांना द्यावे तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खात्री देतो असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याचे समजते, यामुळेच आज शिंदे गटाने नरमाईची भूमिका स्वीकारली, खाते त्यांच्याकडे जाण्यास हरकत नसल्याचे प्रसारमाध्यमांकडे सांगितले गेले , त्यानंतर वित्त आणि सहकार ही खाती राष्ट्रवादीला देण्याचे ठरले आहे असे काल सायंकाळी उशिरा समजले आहे.

अजित पवार यांनी देखील मागील अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीरपणे कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगितले होते, त्यावर त्यांना आता कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल, अर्थात यावर भाजपचा वचक असेलच, वित्त या खात्यासोबत सहकार हे राष्ट्रवादी साठी महत्वाचे खाते आहे तेही त्यांना मिळणार आहे, सोबत महिला व बालविकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, क्रीडा आदी खाती देखील मिळाली आहेत. आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असून मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तारही आज करून काही नाराज आणि इच्छुक आमदारांना त्यात सामावून घेतले जाणार आहे असे बोलले जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत