BREAKING NEWS
latest

महाराष्ट्रातील सर्व भागात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

राज्यातील नागरिकांची व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये तसंच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदतकार्य व बचावकार्य सुरु करावं, अशा सुचना आपत्ती प्रशासनाला दिल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुंबईसह ठाणे आणि उपनगर परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्याने मध्य आणि हर्बर लाईनवर लोकलसेवा पुर्णतः विस्कळीत झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यावेळी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन देखील केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईसह परिसरात खुप पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित आपत्कालीन यंत्रणांना दिले आहेत. काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी एनडीआरएफ तसेच जिल्हा प्रशासनांना देखील निर्देश देण्यात आले आहेत. आपण सकाळपासूनच मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदतकार्य व बचावकार्य सुरु करावं, अशा सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईसह उपनगरातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं हवामान खात्याने अलर्ट जारी केल्यानुसार आवश्यक त्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तथा सुरक्षित ठिकाणी रहावं, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. यावेळी त्यांनी मुंबई व परिसरातील शाळा-कॉलेजला लवकर सुट्टी देण्यात आली असल्याचं सांगत मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यात आलं असल्याची प्रसिद्धीमाध्यमांना माहिती दिली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत