रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंडचा नव्या वर्षाचा पदग्रहण सोहळा २० जुलै २०२३ रोजी डोंबिवली पश्चिम येथील मीराबाई कागदे हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी रोटरी ३१४२ डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मिलिंद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच फर्स्ट लेडी माधवी मॅडम, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग सर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन डोंगरे सर, जीएसए रोटेरियन हिना मॅडम आणि डिस्ट्रिक्टचे इतर पदाधिकारी ही यावेळी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले, मानद सचिव रोटेरियन जगदीश तांबट, खजिनदार रोटेरियन डॉक्टर मालिनी नाडकर्णी आणि सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मिलिंद कुलकर्णी यांनी नव्या कार्यकारणीला बहुमोल मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष रोटेरियन संजय कागदे यांनी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेतला. नूतन अध्यक्षांनी आजपर्यंत केलेले प्रकल्पांची आणि आगामी वर्षभरात आयोजित करणार असलेल्या समाजोपयोगी प्रकल्पांची थोडक्यात माहिती दिली.
एका नव्या रोटरी सदस्याचे रोटरी पिन आणि कीट देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांना थोडक्यात माहीती देण्यात आली. जाॅईन्ट सेक्रेटरी रोटेरियन मनोज क्षिरसागर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन डॉक्टर वनिता क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाला डोंबिवली डायमंडस क्लबचे सर्व रोटरी सदस्य आणि परिवार उपस्थित होते तसेच डोंबिवलीतील इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष देखील उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा