BREAKING NEWS
latest

स्वप्नांची उत्तुंग भरारी घेत भारताकडून इसरोचे चांद्रयान -३ चे प्रक्षेपण यशस्वी..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी २:३५ वाजता 'बाहुबली रॉकेट एलव्हीएम३-एम४'  द्वारे ते अवकाशात पाठवले गेले. १६ मिनिटांनंतर चंद्रयान रॉकेटद्वारे कक्षेत प्लेस करण्यात आले. इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये उपस्थित होते. चांद्रयान-३ चं प्रक्षेपण पाहण्यासाठी २०० विद्यार्थी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात दाखल झाले होते.
या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. चांद्रयान-३ अंतराळयानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे ४० दिवसांनंतर म्हणजेच २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही १४ दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. चांद्रयान-३ मिशनच्या माध्यमातून इसरो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल.
चांद्रयान-२ च्या अथक परिश्रम आणि प्रक्षेपणानंतर ३ वर्षे, ११ महिने आणि २३ दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-३ मिशन लॉन्च करून जगातील आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत